Lokmat Sakhi >Food > डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, करा इन्स्टंट मुरमुरे इडली.. पौष्टिक पदार्थ झटपट

डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, करा इन्स्टंट मुरमुरे इडली.. पौष्टिक पदार्थ झटपट

Instant Murmura Idli Recipe | Quick & Easy इडली खायची इच्छा झाली? मुरमूऱ्यांची बनवा झटपट इडली, कमी साहित्यात खा पोटभर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 05:39 PM2023-04-18T17:39:20+5:302023-04-18T17:40:04+5:30

Instant Murmura Idli Recipe | Quick & Easy इडली खायची इच्छा झाली? मुरमूऱ्यांची बनवा झटपट इडली, कमी साहित्यात खा पोटभर..

Instant Murmura Idli Recipe | Quick & Easy | डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, करा इन्स्टंट मुरमुरे इडली.. पौष्टिक पदार्थ झटपट

डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, करा इन्स्टंट मुरमुरे इडली.. पौष्टिक पदार्थ झटपट

मुरमूऱ्यांचा वापर आपण भेळ, चिवडा, भडंग बनवण्यासाठी करतो, पण कधी आपण मुरमूऱ्यांची इडली खाल्ली आहे का? दाक्षिणात्य पदार्थ जसे इडली, डोसा, मेदू वडा हे पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे आहेत. नाश्त्यासाठी हे पदार्थ उत्तम मानले जाते. पण हे पदार्थ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ८ तास आधी तांदूळ, डाळ भिजत ठेवावे लागते.

पीठ चांगले भिजल्यानंतर हे पदार्थ परफेक्ट तयार होते. पण आता पीठ भिजवण्याचं टेन्शन नाही. आपण मुरमूऱ्यांचा वापर करून इडली बनवू शकता. काही मिनिटात ही रेसिपी रेडी होते. यासाठी तुम्हाला तांदूळ, डाळ किंवा इतर साहित्य भिजत ठेवायची गरज नाही. ही रेसिपी काही मिनिटात झटपट तयार होते. चला तर मग मुरमूऱ्यांची इडली हा पदार्थ कसा बनतो हे पाहूयात(Instant Murmura Idli Recipe | Quick & Easy).

मुरमूऱ्यांची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

मुरमुरे 

रवा 

मीठ 

दही 

हिरवी मिरची

उन्हळ्यात खायलाच हवी फणसाची चमचमीत भाजी, चव अशी की येईल गावकडची आठवण

आलं

इनो

या पद्धतीने बनवा मुरमूऱ्यांची इडली

इडली बनवण्यासाठी प्रथम ३ कप मुरमुरे पाण्यात भिजवा, मुरमुरे भिजल्यानंतर मिक्सरमध्ये घाला, व त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. यात पाणी मिक्स करण्याची गरज नाही. आता या पेस्टमध्ये १ कप रवा, चवीनुसार मीठ, एक कप दही आणि अर्धा कप पाणी घालून मिश्रण मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर १५  मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून दही मिश्रणात चांगले मिसळेल.

साऊथ इंडियन कारा चटणीची झटपट कृती, इडली-डोशासोबत खाण्यासाठी चटकदार चटणी

दुसरीकडे, २ हिरव्या मिरच्या व आल्याची पेस्ट बनवा. पेस्ट तयार झाल्यानंतर इडलीच्या पिठात घालून मिक्स करा. १५ मिनिटे झाल्यानंतर त्यात पाणी व एक चमचा इनो घालून ५ मिनिटे ठेवा, व चमच्याने मिश्रण चांगले मिक्स करा.

आता इडलीच्या भांड्यात ज्याप्रमाणे आपण इडली बनवतो, त्याचप्रमाणे मुरमूऱ्यांची इडली तयार करा. इडली साच्यात बॅटर घालून १५ मिनिटे वाफवून घ्या. साचा थंड झाल्यावर चाकूच्या साहाय्याने इडली बाहेर काढा. अशा प्रकारे इडली खाण्यासाठी रेडी. आपण ही इडली चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता.

Web Title: Instant Murmura Idli Recipe | Quick & Easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.