Join us  

मुरमुऱ्याचा मेदूवडा कधी करून पाहिलं का? १५ मिनिटांत करा झटपट पौष्टिक ब्रेकफास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2024 10:00 AM

Instant Murmura Medu Vada in 10 Mins | Tasty & Healthy Bhel Snacks - Bhel Medu Vada : उडीद डाळ भिजत न घालता मेदू वडा करायचा? मग ही रेसिपी पाहा..

मुरमुरे हा एक हलका - फुलका, कुरकुरीत स्नॅक्सचा प्रकार आहे (Crispy Medu Vada). जो सगळ्यांना खायला आवडतो. मुरमुऱ्याचे अनेक पदार्थ केले जातात. रमुऱ्यांचे लाडू, चिवडा, भेळ, भडंग हे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात (Snacks). टी टाईम स्नॅक्स किंवा मधल्या वेळेत भूक लागली तर आपण मुरमुऱ्यांचे हलके - फुलके स्नॅक्स खातो (Breakfast Recipe). पण आपण कधी मुरमुऱ्याचे खमंग कुरकुरीत मेदू वडे करून पाहिलं आहे का?

मेदू वडे हा दाक्षिणात्य पदार्थ. उडीद डाळीचे मेदू वडे आपण खाललेच असतील. पण घरात उडीद डाळ  उपलब्ध नसेल किंवा मेदू वडे खाण्याची इच्छा झाली तर, मुरमुऱ्याचे मेदू वडे करून पाहा. काही मिनिटात झटपट कुरकुरीत मेदू वडे तयार होतील(Instant Murmura Medu Vada in 10 Mins | Tasty & Healthy Bhel Snacks - Bhel Medu Vada).

मुरमुऱ्याचे मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

मुरमुरे

हिरवी मिरची

कडीपत्ता

आलं

कोथिंबीर

पांढरे तीळ

चिली फ्लेक्स

बाथरूमच्या टाईल्स घासूनही अस्वच्छ-घाणेरड्या दिसतात? बेकिंग सोड्याचा करा ‘हा’ झटपट उपाय; टाईल्स चकाचक

जीरे

मीठ

तांदळाचं पीठ

दही

तेल

कृती

सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मुरमुरे घ्या. त्यात पाणी घालून मुरमुरे भिजत घाला. ५ मिनिटानंतर त्यातून पाणी वगळून काढा. भिजलेले मुरमुरे दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कडीपत्ता, आलं, कोथिंबीर, पांढरे तीळ, चिली फ्लेक्स, जीरे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

आईबाबांनी मुलांशी कोणत्या वयात काय बोलावे - कसे वागावे? मुलं आईबाबांपासून तुटतात - भांडतात कारण..

नंतर त्यात वाटीभर तांदळाचं पीठ आणि दही घालून हाताने साहित्य एकजीव करा. दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात मिश्रणाचे गोळे सोडा. गोळ्यांना मेदू वड्याचा आकार द्या. अशा प्रकारे मुरमुऱ्याचे खमंग कुरकुरीत मेदू वडे खाण्यासाठी रेडी. आपण हे मेदू वडे चटणी किंवा सांबरसोबत खाऊ शकता. 

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.