Lokmat Sakhi >Food > ५ मिनीटांत झटपट करा बिन-तेलाचे अप्पम! पौष्टीक नाश्ता, दिवसाची चविष्ट सुरुवात

५ मिनीटांत झटपट करा बिन-तेलाचे अप्पम! पौष्टीक नाश्ता, दिवसाची चविष्ट सुरुवात

साऊथ इंडियन अप्पम बनवायचे असेल तर त्यासाठी तांदूळ, नारळ आणि दूध हे पदार्थ आवश्यक असतात. पण आपण घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून ५ मिनीटांत अगदी झटपट अप्पम कसे करायचे पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 12:30 PM2022-03-04T12:30:12+5:302022-03-04T12:32:09+5:30

साऊथ इंडियन अप्पम बनवायचे असेल तर त्यासाठी तांदूळ, नारळ आणि दूध हे पदार्थ आवश्यक असतात. पण आपण घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून ५ मिनीटांत अगदी झटपट अप्पम कसे करायचे पाहूया...

Instant non-oil appam in 5 minutes! Nutritious breakfast, a delicious start to the day | ५ मिनीटांत झटपट करा बिन-तेलाचे अप्पम! पौष्टीक नाश्ता, दिवसाची चविष्ट सुरुवात

५ मिनीटांत झटपट करा बिन-तेलाचे अप्पम! पौष्टीक नाश्ता, दिवसाची चविष्ट सुरुवात

Highlightsकधी रात्रीच्या जेवणासाठी तर कधी अचानक कोणी पाहुणे येणार असतील तर पटकन होणारा हा वेगळा पदार्थ आपण नक्की करु शकतो.डोशाप्रमाणे हे पीठ तव्यावर घालताना तेलाची गरज नसल्याने ज्यांना पथ्य आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

सकाळचा नाश्ता, स्वयंपाक एकाच वेळी करायचे म्हणजे महिलांसाठी तारेवरची कसरत. ब्रेकफास्टला (Breakfast) रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर सगळ्यांना आवडणारे साऊथ इंडियन (South Indian appam) पदार्थ करु शकतो. पण हे पदार्थ करायला थोडा वेळ लागतो अशी आपली तक्रार असते. पण ५ मिनीटांत झटपट साऊथ इंडियन हटके पदार्थ आपल्या समोर आला तर...आता असा पदार्थ कोणता असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं नाव आहे अप्पम...विशेष म्हणजे पोटभरीचा आणि पौष्टीक असल्याने लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण हा पदार्थ आवडीने खातो. कधी रात्रीच्या जेवणासाठी तर कधी अचानक कोणी पाहुणे येणार असतील तर पटकन होणारा हा वेगळा पदार्थ आपण नक्की करु शकतो.

आपण इडली, डोसा, उतप्पा हे पदार्थ नेहमीच करतो, पण अप्पम हा पदार्थ आपण घरी फारसा ट्राय करत नाही. पण झटपट होणारे अप्पम चवीला तर मस्त लागतातच पण पौष्टीकही असतात. विशेष म्हणजे तेलाशिवाय होत असल्याने ज्यांना पथ्य आहे अशांसाठी हा अप्पम एक उत्तम पर्याय आहे. पारंपरिक साऊथ इंडियन अप्पम बनवायचे असेल तर त्यासाठी तांदूळ, नारळ आणि दूध हे पदार्थ आवश्यक असतात. पण आपण घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून ५ मिनीटांत अगदी झटपट अप्पम कसे करायचे पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. एका बाऊलमध्ये भिजवलेले पोहे, रवा, पाणी आणि दही आणि मीठ एकत्र करुन ठेऊन द्या. 

२. हे सगळे मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्यामध्ये थोडे इनो घाला. इनोमुळे अप्पम हलके व्हायला मदत होईल.

३. तव्यावर हे पीठ डोशाप्रमाणे पण थोडे जाडसर घाला आणि एका बाजूने होत आल्यावर गरमागरम खायला घ्या.

४. डोशाप्रमाणे हे पीठ तव्यावर घालताना तेलाची गरज नसल्याने ज्यांना पथ्य आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

५. हे अप्पम तूप, बटर, चटणी, सांबार, सॉस, दही अशा कशासोबतही मस्त लागतात. 


 

 

 

Web Title: Instant non-oil appam in 5 minutes! Nutritious breakfast, a delicious start to the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.