Join us  

ओट्स डोसा खाऊन तर पाहा, नाश्त्याला झटपट पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याचा ५ मिनिट फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2024 2:06 PM

Instant Oats Dosa | Oats Recipe for Weight loss; 5 Minute Breakfast : नाश्त्याला बनवा झटपट ओट्स डोसा; चविष्ट खा आणि वजन घटवा

अनेकदा नाश्ता करायला उशीर होतो. किंवा नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही (Weight Loss Nashta). पोहे, उपमा खाऊनही कंटाळा येतो. साऊथ इंडियन पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात (Fitness). पण नेहमी डाळ - तांदूळ भिजत घालणं शक्य  होत नाही. जर आपल्याला डाळ - तांदुळाचा डोसा खायचा नसेल तर, किंवा डाळ - तांदूळ आपण भिजत घालायला विसरले असाल तर, ओट्सचा कुरकुरीत डोसा करून पाहा (Dosa Recipe).

ओट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात जीवनसत्त्व बी, बी-२, बी-३, बी-५, बी-६ यांसह लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त, तांबे व मॅंगनीज आढळते. ओट्सचे आपण विविध पदार्थ खाल्लेच असतील, आता ओट्सचा कुरकुरीत डोसाही करून पाहा. आपण हा पौष्टीक डोसा मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता(Instant Oats Dosa | Oats Recipe for Weight loss; 5 Minute Breakfast).

ओट्स डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

ओट्स

चणा डाळ

ना तेल - ना सोडा, कपभर कडधान्याचा करा कुरकुरीत डोसा; अगदी १० मिनिटात वेट लॉस नाश्ता रेडी

तूर डाळ

मेथी दाणे

मीठ

तेल

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ कप ओट्स घ्या. त्यात एक कप उडीद डाळ, एक चमचा चणा डाळ, एक चमचा तूर डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे घालून मिक्स करा. नंतर त्यात पाणी घालून साहित्य स्वच्छ धुवून घ्या.

डाळ - तांदूळ न भिजवता, न आंबवता; अगदी १५ मिनिटात करा सॉफ्ट 'तडका' इडली; मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट

नंतर त्यात पुन्हा २ कप पाणी ओतून ६ तासांसाठी भिजत ठेवा. ६ तास भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून, त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्या. पीठ आंबवण्यासाठी ८ ते ९ तासांसाठी झाकून ठेवा. ८ तासानंतर बॅटर व्यवस्थित फरमेण्ट होईल. त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर  बॅटर ओतून पसरवा. अशा प्रकारे कुरकुरीत आणि पौस्तिक ओट्स डोसा खाण्यासाठी रेडी. आपण हा डोसा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स