Lokmat Sakhi >Food > फक्त १० मिनिटात पोह्याचे बनवा मऊ - जाळीदार अप्पम; ही घ्या सोपी रेसेपी-विकेंड स्पेशल!

फक्त १० मिनिटात पोह्याचे बनवा मऊ - जाळीदार अप्पम; ही घ्या सोपी रेसेपी-विकेंड स्पेशल!

Instant Poha Appam Recipe : इडली किंवा डोसा बनवायचा म्हणजे पीठ दळा, आंबवा  अशी तयारी आधीच करावी लागते. प्रत्येकवेळी आपल्याकडे इतकावेळ असतोच असं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 08:45 AM2022-07-23T08:45:00+5:302022-07-23T18:29:21+5:30

Instant Poha Appam Recipe : इडली किंवा डोसा बनवायचा म्हणजे पीठ दळा, आंबवा  अशी तयारी आधीच करावी लागते. प्रत्येकवेळी आपल्याकडे इतकावेळ असतोच असं नाही.

Instant Poha Appam Recipe : Poha appam for breakfast make poha appam breakfast in just 10 minutes in weeend | फक्त १० मिनिटात पोह्याचे बनवा मऊ - जाळीदार अप्पम; ही घ्या सोपी रेसेपी-विकेंड स्पेशल!

फक्त १० मिनिटात पोह्याचे बनवा मऊ - जाळीदार अप्पम; ही घ्या सोपी रेसेपी-विकेंड स्पेशल!

(Image Credit- recipes.timesofindia.com)

जर तुम्ही  फूड लव्हर असाल तर  सकाळी उठल्यानंतर काहीतरी मस्त नाश्ता असावा असं तुम्हाला नक्कीच वाटत असणार. इडली, डोसा, सांभार याव्यतिरिक्त अनेक साऊथ इंडियन पदार्थ खाण्याचा मोह आवरला जात नाही. (Cooking Hacks) कारण ते पदार्थ केवळ अत्यंत चवदारच नाही तर हलके आणि आरोग्यदायी देखील असतात. त्यामुळे असा नाश्ता आपला दिवस सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. पण इडली किंवा डोसा बनवायचा म्हणजे पीठ दळा, आंबवा  अशी तयारी आधीच करावी लागते. (Instant Poha Appam Recipe) 

प्रत्येकवेळी आपल्याकडे इतकावेळ असतोच असं नाही. कामच्या गडबडीत झटपट तयार होणारे काहीतरी पौष्टीक पदार्थ  बनवावे लागतात. या लेखात तुम्हाला  पोह्यांपासून अगदी कमीत कमी वेळात अप्पम बनवण्याची रेसेपी सांगणार आहोत. (Make Soft and Spongy Appam Poha in Just 10 Minutes for a Quick Breakfast) अप्पम हा क्लासिक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. अनेकदा साईट डिश म्हणून खाल्ले जाते. अप्पम आंबवलेले तांदूळ आणि किसलेले खोबरे यांच्यापासून बनवले जाते, परंतु ही रेसिपी आंबवण्याच्या प्रक्रियेशिवाय हा लोकप्रिय पदार्थ कसा बनवायचा हे शिकवते. (Poha appam for breakfast make poha appam for quick breakfast in just 10 minutes)

कसे बनवायचे पोह्यांचे इंस्टंट अप्पम (How To Make Instant Poha Appam For A Quick Breakfast)

हे झटपट अप्पम बनवण्यासाठी पोहे, रवा, दही, मीठ आणि पाणी घालून एकजीव करा. ते नीट मिसळा आणि थोडा वेळ तसेच ठेवा. या दरम्यान तुम्ही तुमच्या आवडीची स्वादिष्ट चटणी बनवू शकता. पीठ  आल्यावर बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. मीठ आणि आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला. तवा गरम करून पीठ घाला, मंद आचेवर शिजू द्या. तुम्हाला अप्पम फ्लिप करण्याची गरज नाही. अप्पमवरील हवेचे बुडबुडे एकसारखे शिजले की अप्पम तयार होईल. 

Web Title: Instant Poha Appam Recipe : Poha appam for breakfast make poha appam breakfast in just 10 minutes in weeend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.