Lokmat Sakhi >Food > १ वाटी पोहे वापरून करा बिना तेलाचे जाळीदार, मऊ डोसे; ही घ्या परफेक्ट, इस्टंट डोसा रेसेपी

१ वाटी पोहे वापरून करा बिना तेलाचे जाळीदार, मऊ डोसे; ही घ्या परफेक्ट, इस्टंट डोसा रेसेपी

Instant Poha Rava Dosa : इस्टंट डोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी प्रत्येकी एक कप रवा, पोहे आणि दही एकत्र करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 08:50 AM2023-01-26T08:50:00+5:302023-01-26T08:50:01+5:30

Instant Poha Rava Dosa : इस्टंट डोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी प्रत्येकी एक कप रवा, पोहे आणि दही एकत्र करा.

Instant Poha Rava Dosa : Instant Aval Dosa Easy Poha Appam Recipe | १ वाटी पोहे वापरून करा बिना तेलाचे जाळीदार, मऊ डोसे; ही घ्या परफेक्ट, इस्टंट डोसा रेसेपी

१ वाटी पोहे वापरून करा बिना तेलाचे जाळीदार, मऊ डोसे; ही घ्या परफेक्ट, इस्टंट डोसा रेसेपी

नाश्त्याला तेच तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. नाश्त्याला  पोहे, उपमा असे तेच तेच पदार्थ खायला नको वाटतात. (Cooking Hacks & Tricks) इडली डोसा बनवायचं म्हटलं की भिजवणं, दळणं असं खूप काय काय करावं लागत असल्यानं  घरी बनवणं टाळलं जातं. घरच्याघरी इस्टंट डोसे बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. फक्त १ वाटी पोहे वापरून तुम्हाला डोसे बनवता येतील.  १५ ते २० मिनिटात हा पदार्थ बनून तयार होईल. (How to make instant dosa)

इस्टंट डोसे बनवण्याची रेसेपी

1) इस्टंट डोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी प्रत्येकी एक कप रवा,  पोहे आणि दही एकत्र करा.

२) या मिश्रणात गरजेनुसार मीठ घाला.

३) थोडं पाणी घालून हे मिश्रण दळून घ्या.

४) दळलेलं मिश्रण तयार झाल्यानंतर  त्यात इनो घाला.

५) तवा गरम करून मध्यम आकाराचे डोसे  तयार करा. हे डोसे तुम्ही चटणी किंवा सांबारसह  खाऊ शकता.

Web Title: Instant Poha Rava Dosa : Instant Aval Dosa Easy Poha Appam Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.