Lokmat Sakhi >Food > नाचणीच्या इडलीची पाहा सोपी-झटपट आणि चविष्ट रेसिपी, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ-पोेषणही भरपूर

नाचणीच्या इडलीची पाहा सोपी-झटपट आणि चविष्ट रेसिपी, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ-पोेषणही भरपूर

Instant Ragi Idli Recipe: नाचणीची इडली करण्याची ही बघा एकदम सोपी रेसिपी. मोजकेच पदार्थ वापरून नाचणीची मस्त मऊ, स्पाँजी इडली कशी करायची ते पाहा... (nachanichi idli recipe in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 02:03 PM2024-02-12T14:03:53+5:302024-02-12T16:07:34+5:30

Instant Ragi Idli Recipe: नाचणीची इडली करण्याची ही बघा एकदम सोपी रेसिपी. मोजकेच पदार्थ वापरून नाचणीची मस्त मऊ, स्पाँजी इडली कशी करायची ते पाहा... (nachanichi idli recipe in marathi)

Instant ragi idli recipe, How to make ragi idli, nachanichi idli recipe in marathi, perfect breakfast menu, healthy and tasty tiffin options for kids | नाचणीच्या इडलीची पाहा सोपी-झटपट आणि चविष्ट रेसिपी, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ-पोेषणही भरपूर

नाचणीच्या इडलीची पाहा सोपी-झटपट आणि चविष्ट रेसिपी, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ-पोेषणही भरपूर

Highlightsनाचणीची भाकरी ज्यांना आवडत नाही, असे लोकही नाचणीची चवदार इडली आवर्जून खातील. शिवाय लहान मुलांना डब्यात द्यायलाही हा पदार्थ अतिशय उत्तम आहे

नाचणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे ती नियमितपणे खायला हवी असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात. मधुमेह, हृदयाचे आजार असणाऱ्यांनी तसेच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी नाचणी नियमितपणे खायला पाहिजे. पण नाचणीची चव अनेकांना आवडत नाही. त्यामुळे मग नाचणीची भाकरीही नकोशी वाटते. म्हणूनच हा बघा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय. नाचणीची भाकरी ज्यांना आवडत नाही, असे लोकही नाचणीची चवदार इडली आवर्जून खातील (How to make ragi idli). शिवाय लहान मुलांना डब्यात द्यायलाही हा पदार्थ अतिशय उत्तम आहे (healthy and tasty tiffin options for kids). बघा नेमकी कशी करायची नाचणीची इडली... (perfect breakfast menu)

 

नाचणीची इडली करण्याची रेसिपी

साहित्य

१ कप रवा

१ कप नाचणीचे पीठ

 

 

३, ५ की १०? दररोज किती बदाम खाणं तब्येतीसाठी चांगलं? नेमकं कधी खावेत? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

१ कप दही

चवीनुसार मीठ

फक्त ३ स्टेप्समध्ये करा बीटरुटचं मिनी फेशियल, व्हॅलेटाईन्स डे ला चेहऱ्यावर येईल मस्त गुलाबी ग्लो

अर्धा टिस्पून बेकिंग सोडा

लसूण, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर या सगळ्या भाज्यांचे काप मिळून १ कप. भाज्या टाकायच्या नसतील तरी चालेल. पण भाज्या टाकल्या की आणखी छान चव येते.

 

कृती

सगळ्यात रवा थोडा भाजून घ्या.

यानंतर सगळ्या भाज्यांचे काप करा आणि मिक्सरमधून फिरवून त्याची प्यूरी करून घ्या.

यानंतर भाजून थंड झालेला रवा, नाचणीचे पीठ, भाज्यांची प्युरी, दही हे सगळं मिश्रण एका भांड्यात घ्या आणि पाणी टाकून कालवून घ्या. 

प्रेग्नंट असताना केलं ॲक्शन मुव्हीचं शुटिंग- यामी गौतम म्हणते सगळं खूपच चॅलेंजिंग होतं, कारण.....

आपण नेहमी इडली करताना जसं पीठ ठेवतो, साधारण तेवढंच घट्ट हे पीठ असावं. यानंतर मीठ आणि बेकिंग सोडा घाला. पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवून घ्या आणि अर्धा तास झाकून ठेवा.

यानंतर नेहमीप्रमाणे जशा इडल्या लावतो, तशा या पिठाच्याही इडल्या लावा. 

भाज्या घातल्यामुळे या इडल्या खूप चवदार होतात. त्यामुळे त्या नुसत्या खाल्ल्या तरी चालते. पण तरी तुम्ही चटणी, लोणचं, सॉस यासोबत ही नाचणीची इडली खाऊ शकता. 
 

Web Title: Instant ragi idli recipe, How to make ragi idli, nachanichi idli recipe in marathi, perfect breakfast menu, healthy and tasty tiffin options for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.