इडली (Idli) म्हटलं की वाटणं, दळणं, तांदूळ भिजवणं ही प्रोसेस करावी लागते. (Instant Rava Besan Idli) या प्रक्रियेत बराचवेळ जातो. कधीही इडली खायची इच्छा झाल्यास तुम्हाला ऐनवेळी काय करावं ते सुचत नसेल तर तुम्ही इस्टंट इडली बनवू शकता. (Idli Recipe) ही इंस्टंट इडली बनवण्यसाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. कमीत कमी साहित्यात कमी वेळेत मऊ, लुसलुशीत इडल्या बनून तयार होतील. रव्याच्या डोश्याप्रमाणेच इडल्याही करायला एकदम सोप्या असतात. ( How To Make Instant Rawa Besan Idli)
रवा-बेसन इडली करण्यासाठी लागणारं साहित्य (Rava Idli Making Process)
1) बेसन पीठ- अर्धा कप
2) रवा- अर्धा कप
3) दही- अर्धा कप
4) पाणी - अर्धा कप
5) इनो (फ्रुट्स सॉल्ट) - १ टिस्पून
6) हळद- १ टिस्पून
7) लिंबाचा रस - १ टिस्पून
8) तेल -१ टिस्पून
9) मीठ -१ टिस्पून
रवा बेसन करण्याची कृती (Right Way To Cook Rava Idli)
1) सगळ्यात आधी एका वाटीत बेसन, रवा, दही, लिंबाचा रस, तेल, मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून झाकून ठेवा. १० ते १५ मिनिटं झाकून ठेवल्यानंतर या मिश्रणात पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्या.
माधुरीचे पती डॉ.राम नेने फिट राहण्यासाठी काय खातात? नाश्ता, जेवणाचं साधं रूटीन-पाहा
2) त्यात १ टिस्पून एनो घालून चमच्याने ढवळून घ्या. सगळ्यात आधी इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात हे मिश्रण घालून घ्या. १५ मिनिटं इडल्या वाफवून घ्या. १० ते १५ मिनिटांनी इडल्या वाफवून तयार झालेल्या असतील.
3) एका फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता, मिरची घालून फोडणी तयार करा. तयार फोडणी इडलीवर घाला.
वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल
4) तयार आहे गरमागरम रवा बेसन इडली. ही इडली तुम्ही सांभार, नारळाची चटणी कशाहीबरोबर खाऊ शकता. या इडलीची चवही अप्रतिम असते.