नाश्त्याला आपण अनेक पदार्थ करतो. पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदू वडा, हे पदार्थ आवडीने खातो. ढोकळा या पदार्थाचा देखील खवय्यावर्ग खूप मोठा आहे. ढोकळा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काही लोकं घरी देखील ढोकळा करून पाहतात. पण काहींचा ढोकळा फसतो, तर काहींचा ढोकळा परफेक्ट स्पंजी तयार होतो.
ढोकळा करण्याची खूप मोठी प्रोसेस आहे. जर आपल्याला झटपट ढोकळा खाण्याची इच्छा झाली असेल तर, गुजराथी स्टाईल रव्याचा ढोकळा ही रेसिपी ट्राय करून पाहा. कमी साहित्यात - कमी वेळात हा पदार्थ रेडी होतो. आपण हा पदार्थ लहान मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता(Instant Rava Dhokla Recipe with Spicy Green Chutney).
रव्याचा इन्स्टंट ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य
रवा - १ कप
आंबट दही - १ कप
बेकिंग सोडा - 1 टीस्पून
आवश्यकतेनुसार तेल
पाणी - 1/3 कप
मीठ - चवीनुसार
फोडणीसाठी लागणारं साहित्य
कोथिंबीर २ दिवसात सुकून खराब होते? ४ सोप्या ट्रिक्स, कोथिंबीर आठवडाभर टिकेल - राहील फ्रेश
राई - १/२ टीस्पून
तीळ - 1/2 टीस्पून
जिरे - १/२ टीस्पून
चिरलेली हिरवी मिरची - १
कढीपत्ता - 8-10
कोथिंबीर
तेल - 1 टीस्पून
कृती
रवा ढोकळा करण्यासाठी सर्वप्रथम, एका भांड्यात रवा घ्या, त्यात एक कप दही, एक कप पाणी घालून मिक्स करा. यानंतर चवीनुसार मीठ घालून चांगले फेटून घ्या. मिश्रण मिक्स करताना त्यात गाठी तयार होणार नाही याची काळजी घ्या. बॅटर रेडी झाल्यानंतर त्यावर २० मिनिटांसाठी झाकण ठेऊन बाजूला सेट करण्यासाठी ठेवा.
बॅटर सेट झाल्यानंतर त्यात बेकिंग सोडा घालून मिक्स करा. एक ताठ घ्या, त्याला तेल लावून ग्रीस करा. त्यावर तयार बॅटर घालून ठेवा. ढोकळा बनवण्याच्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. व बॅटरचं ताठ त्यात ठेऊन भांडं एका प्लेटने झाका. १० मिनिटानंतर ताठ बाजूला काढून ढोकळा शिजला आहे की नाही, हे चाकूने चेक करा. ढोकळा शिजला असेल तर, गॅस बंद करा. व ढोकळा थंड झाल्यानंतर त्याचे चौकोनी काप करा.
न डाळ भिजत घालण्याची गरज ना वाटण्याची, १५ मिनिटांत करा ब्रेडचे मेदू वडे- करायलाही सोपे
फोडणीसाठी, सर्वप्रथम फोडणीच्या पळीत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, मोहरी, तीळ, चिरलेली हिरवी मिरची, कडीपत्ता, घालून फोडणी ढोकळ्यावर पसरवा. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा.