गुजरात पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. परंतु, येथील पदार्थ देखील तितकेच फेमस आहे. गुजराथी पदार्थ फक्त गुजरातमध्ये नसून, संपूर्ण भारतात चवीने खाल्ले जातात. जलेबी, फाफडा, ढोकळा, खांडवी हे पदार्थ तर फेमस आहेतच, यासह हांडवो ही रेसिपी देखील तितकीच आवडीने खाल्ली जाते. गुजराथी पदार्थ करताना बेसनाचा वापर जास्त होतो.
हांडवो ही रेसिपी करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. जर आपल्याला इन्स्टंट - झटपट ही रेसिपी ट्राय करायची असेल तर, रव्यापासून हांडवो तयार करा. आपण ही रेसिपी ब्रेकफास्टमध्ये करून खाऊ शकता. चला तर मग इन्स्टंट हांडवो ही रेसिपी तयार कशी करायची हे पाहूयात(Instant Rava Handvo | Vegetable Rava Handvo in Pan).
इन्स्टंट हांडवो करण्यासाठी लागणारं साहित्य
रवा
बेसन
फेटून घेतलेलं दही
किसलेला गाजर
बारीक चिरलेला कोबी
बारीक चिरलेली सिमला मिरची
शेंगदाण्याचं कूट
बारीक चिरलेली हिरवी मिरची
मोहरी
हळद
न आंबवता - ५ डाळींचा करा प्रोटीन डोसा! वजन कमी करण्यासाठी बेस्ट नाश्ता, ग्लुटेन फ्री स्पेशल डोसा
लाल तिखट
धणे पूड
कडीपत्ता
आल्याची पेस्ट
इनो
मीठ
कृती
एका बाऊलमध्ये एक कप रवा, बेसन, आणि फेटलेलं दही घेऊन मिक्स करा. गरजेनुसार आपण त्यात पाणी मिक्स करू शकता. त्यानंतर त्यात चिमुटभर हळद, दोन टेबलस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून धणे पूड, एक टेबलस्पून आल्याची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मसाले मिक्स केल्यानंतर त्यात किसलेला गाजर, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला सिमला मिरची आणि शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करा. जर बॅटर जास्त घट्टसर वाटत असेल तर, त्यात गरजेनुसार पाणी मिक्स करा.
न वाफवता-न उकडता अळूवडी करण्याची झटपट रेसिपी, श्रावणात अळूवडी जेवणात हवीच..
साहित्य मिक्स केल्यानंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेऊन बाजूला ठेवा. १० मिनिटानंतर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. तयार बॅटरमध्ये एक चमचा इनो घालून मिक्स करा. पॅनमध्ये २ ते ३ चमचे तेल घाला. गरम तेलात अर्धा चमचा मोहरी, तीळ, कडीपत्ता, जिरं घालून गॅस मंद आचेवर ठेवा, म्हणजे मसाले जळणार नाहीत. तीळ आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यात एक चमचा बॅटर घालून पसरवा. बॅटर जाडसर ठेवा, जास्त पसरवू नका. पॅनवर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. मंद आचेवर हांडवो शिजवून घ्या.
५ ते ८ मिनिटानंतर झाकण काढा. व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. व तयार हांडवो एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे हांडवो खाण्यासाठी रेडी.