Join us  

२ कप रवा आणि पाणी, रव्याच्या कुरड्या करण्याची इन्स्टंट रेसिपी; फुलतात तिप्पट-चवही जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2024 12:24 PM

Instant Rava Kurdai | Easy and Quick Kurdai Recipe : सोप्या पद्धतीने रव्याची कुरडई करण्याची इन्स्टंट रेसिपी..

उन्हाळ्यात प्रत्येक घरात वाळवणाचे पदार्थ केले जातात (Instant Kurdai Recipe). कुरडई, पापड, पोंगे, पळी पापड हमखास केले जातात. होममेकर असो किंवा कामावर जाणारी महिला. प्रत्येक महिला वाळवणाचे पदार्थ आणि लोणचे करण्यासाठी खास वेळ काढतेच (Summer Special). प्रत्येकाला कुरडई खायला आवडते. कुरडई अनेक प्रकारची केली जाते (Cooking Tips). काही महिला गव्हाचे चिक काढून कुरडई करतात. ज्याला भरपूर वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. तर, काही जण सोप्या पद्धतीचे तांदुळाच्या पीठाचे किंवा रव्याची कुरडई तयार करतात.

इन्स्टंट कुरड्या तयार करण्यात अधिक वेळ जात नाही. जर आपल्याला इन्स्टंट कुरड्या खायच्या असतील तर, रव्याच्या कुरड्या करून पाहा. कमी वेळात कमी मेहनत घेता, झटपट कुरड्या तयार होतील(Instant Rava Kurdai | Easy and Quick Kurdai Recipe).

रव्याच्या कुरड्या करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

पाणी

कांदा, लसूण आणि आलं न घालताही कटाची आमटी करता येते? पाहा झणझणीत आमटीची सोपी कृती

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप रवा घ्या. त्यात पाणी घालून रवा स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पुन्हा २ कप पाणी घालून २ दिवसांसाठी भिजत ठेवा. पण रोज सकाळी रव्याचे पाणी काढून बदलून घ्या. तिसऱ्या दिवशी, रव्यातलं अतिरिक्त पाणी काढून रव्याचा चिक फेटून घ्या.

ना गॅस-ना पापड खार, उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत पापड; १५ मिनिटात बनतील ५० पापड

नंतर गॅसवर एक भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ कप पाणी घाला. पाणी थोडं गरम झालं की त्यात, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात रव्याचा चिक घालून सतत लाकडी चमच्याने ढवळत राहा. जेणेकरून रव्याच्या गुठळ्या तयार होणार नाही. आता त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा, आणि गॅस बंद करा. वाफेवर मिश्रण शिजवून घ्या.

आता स्टेनलेस स्टीलच्या सोऱ्यात चमच्याने मिश्रण भरा. प्लास्टिक पेपरवर कुरड्या पाडून घ्या. आपण या कुरड्या पंखेच्या हवेखाली किंवा कडकडीत उन्हातही वाळत घालू शकता. २ दिवस उन्हात वाळल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा. जेव्हा खाण्याची इच्छा होईल, तेव्हा तेलात तळून कुरकुरीत कुरड्यांचा आस्वाद लुटा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स