वाळवणाचे पदार्थ करण्याचा उत्तम सिझन म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यांत हमखास प्रत्येक घरोघरी वाळवणाचे पदार्थ केले जातात. या वाळणाच्या पदार्थांपैकी सगळ्यांच्याच घरी केला जाणारा खास पदार्थ म्हणजे गव्हाच्या (Instant Rava Kurdai) चिकाची कुरडई. पांढरीशुभ्र, कुरकुरीत, फुलणारी कुरडई (Ravyachi Kurdai) खाण्याचा आनंद काही औरच असतो. परंतु ही कुरडई करायची म्हणजे फार मोठा घाट घालावा लागतो(How To Make Kurdai At Home).
इतकेच नव्हे तर ही कुरडई करण्याला कसब लागते. गहू ३ ते ४ दिवस पाण्यांत भिजवून त्याचा चीक काढावा लागतो, त्यानंतर तो चीक शिजवून त्याच्या कुरडया तयार करायच्या. कुरडई तयार करायची म्हणजे असा हा एकूण ४ ते ५ दिवसांचा साग्रसंगीत कार्यक्रमच असतो. यातही चीक व्यवस्थित निघाला पाहिजे, तो नीट शिजवला गेला पाहिजे नाहीतर कुरडया फसल्याच म्हणून समजा. परंतु इतके कष्ट आणि मेहनत घेण्यापेक्षा आपण चीक न काढता देखील रव्याची इन्स्टंट कुरडई अगदी झटपट तयार करु शकतो. गव्हाचा चीक न काढता रव्याची इन्स्टंट कुरडई कशी तयार करायची ते पाहूयात.
साहित्य :-
१. रवा - ३०० ग्रॅम
२. पाणी - गरजेनुसार
३. मीठ - चवीनुसार
शिळ्या चपातीची खुसखुशीत, खमंग बाकरवडी, चहासोबत खा आणि सांगा कशी मस्त लागली चव...
मालवणी पद्धतीची ओल्या काजूची झक्कास उसळ, पाहा अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ...
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात रवा घेऊन तो ३ ते ४ वेळा पाणी बदलून रवा स्वच्छ धुवून घ्यावा.
२. रवा स्वच्छ धुण्यासाठी त्यात पाणी घालावे. मग ५ मिनिटे थांबावे या वेळात रवा भांड्याच्या तळाशी जाऊन बसेल. मग वरचे पाणी काढून ओतून द्यावे. याच पद्धतीने रवा ३ ते ४ वेळा धुवून घ्यावा.
३. रवा स्वच्छ धुवून झाल्यावर त्यात पुरेसे पाणी घालून तो ३ ते ४ दिवस पाण्यांत व्यवस्थित भिजवून घ्यावा.
४. रवा ३ ते ४ दिवस पाण्यांत भिजत ठेवलेला असताना दररोज दिवसातून एकदा यातील जुने पाणी ओतून नवीन पाणी भरून घ्यावे.
५. ३ ते ४ दिवसांनी रवा संपूर्णपणे भिजल्यावर त्याचा बुडबुडे येऊन चीक तयार होतो.
यंदा वाळवणात करा वर्षभर टिकणारी दही मिरची, तोंडी लावायला खास चमचमीत पदार्थ...
६. हा तयार चीक एका भांड्यात घेऊन तेवढेच पाणी त्यात ओतावे. मग चवीनुसार मीठ घालावे. आता गॅसची फ्लेम मोठी करून हा चीक व्यवस्थित शिजवून घ्यावा. चीक सतत चमच्याने हलवत थोडा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावा.
७. शिजवलेला चीक पाण्याने भिजलेल्या ओल्या रुमालात गुंडाळून पुन्हा कुकरला लावून २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावा.
८. चीक हाताला चिकटला नाही म्हणजे तो शिजला आहे. असा चीक साच्यात भरून त्याच्या कुरडया पाडून घ्याव्यात.
९. या कुरडया उन्हात ३ ते ४ दिवस किंवा संपूर्ण सुकेपर्यंत वाळवून घ्याव्यात.
चीक न काढता झटपट तयार होणाऱ्या रव्याच्या इन्स्टंट कुरडया खाण्यासाठी तयार आहेत.