मेदूवडा हा पारंपारीक दक्षिण भारतीय पदार्थ आहे (Medu Vada). मेदूवडा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. मेदूवडा बनवण्यासाठी उडीदाच्या डाळीचा उपयोग केला जातो (Food). पण घरात तयार करताना मेदू वडे फसतात. काहींचे मेदू वडे तेल फार पितात. बऱ्याचदा मेदू वड्याचा आकारही बिघडतो (Cooking Tips).
अशावेळी आपण बाजारात जातो आणि मेदू वडे अण्णाच्या स्टॉलवर जाऊन खातो. पण बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरातही मेदू वडे तयार करू शकता. जर घरात उडीद डाळ नसेल तर, आपण कपभर रव्याचेही मेदू वडे करू शकता. यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज नाही. अगदी काही मिनिटात रव्याचे कुरकुरीत मेदू वडे तयार होतील. रव्याचे मेदू वडे करायचे कसे पाहा(Instant Rava Medu Vada in 15 Mins - Crispy Breakfast).
रव्याचे कुरकुरीत मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य
रवा
पाणी
पांढरे केस - हेअर फॉलही जास्त होतो? खोबरेल तेलात मिसळा २ गोष्टी; केस होतील दाट - दिसतील सुंदर
मीठ
तेल
कृती
सर्वात आधी गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ वाटी पाणी घाला. नंतर त्यात चवीनुसार मीठ १ वाटी रवा घालून चमच्याने रवा ढवळत राहा. रवा पाण्यात शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यात चमचाभर तेल घालून मळून घ्या.
दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. रवा मळून झाल्यानंतर हाताला थोडे तेल लावा, आणि छोटा गोळा घेऊन मेदू वड्याप्रमाणे आकार द्या, आणि गरम तेलात सोडा. गरम तेलात कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान खरपूस तळून घ्या. अशाप्रकारे कुरकुरीत मेदू वडे खाण्यासाठी रेडी. आपण हे इन्स्टंट मेदू वडे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता.