Join us  

१ कप रव्याचा करा खमंग मेदू वडा; सोपी कृती, आतून मऊ वरून क्रिस्पी मेदूवडा १० मिनिटांत बनेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 1:24 PM

Instant Rava Medu vada Recipe (Meduvada in 10 Minutes) : रव्याचे मेदूवडे १० मिनिटांत बनून तयार होतील

नाश्त्याला काहीतरी नवीन खाण्याची इच्छा झाली की सगळ्यात आधी साऊथ इंडियन पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थांमध्ये इडली, डोसा, मेदूवडा हे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे असतात. (Rava Medu Kasa kartat) मेदूवड्याचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटतं. मेदू वडा घरच्याघरी करण्यासाठी आधी डाळ भिजवा, दळा ही सगळी प्रोसेस करावी लागते. म्हणून बरेचजण हे पदार्थ घरी करणं टाळतात. (How to make Rava Medu Vada) मेदूवडे करण्यासाठी तुम्ही रव्याचा  वापर करू शकता. रव्याचे मेदूवडे १० मिनिटांत बनून तयार होतील. (Instant Medu vada Making Steps)

रव्याचा इंस्टंट मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य (Rava Medu Vada Recipe)

१) १ कप -रवा

२) १ कप-  दही

३) दीड टेबलस्पून- जीरं

४) १ टेबलस्पून- काळी मिरी

५) १ टेबलस्पून-  आलं

६) २ बारीक चिरलेल्या- हिरव्या मिरच्या

७) पाव टिस्पून - हिंग

८) मीठ- चवीनुसार

९) बारीक केलेला-कढीपत्ता

१०) बारीक चिरलेली- कोथिंबीर

११) दीड टेबलस्पून- बेकींग सोडा

१२) गरजेनुसार- पाणी

१३) गरजेनुसार- तेल

इस्टंट रवा मेदू वडा कसा तयार करायचा? (Instant Medu Vada Recipe in Marathi)

१) रवा मेदू वडा तयार करण्यासाठी एका भांड्यात वाटीभर रवा, दही, जीर, काळी मिरी पावडर, बारीक केलेले आलं, बारीक केलेली मिरची,  हिंग, मीठ, कढीपत्ता घाला. त्यात थोडं थोडं पाणी घालून  सर्व मिश्रण एकजीव करा. 

२) १० ते १५ मिनिटांसाठी  हे पीठ बाजूला  ठेवून द्या. ज्यामुळे पीठ व्यवस्थित फुलून येईल. यात बेकींग सोडा घालून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या. 

३) कढईत तेल गरम करायला ठेवा.  चहाच्या गाळणीच्या साहाय्याने किंवा वाटीच्या मागच्या भागाच्या साहाय्याने मेदू वड्याला योग्य आकार देऊन त्यात मध्ये छिद्र पाडून घ्या.

कंबर-पाठ खूप दुखते? रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधाचा खास फॉर्म्यूला; भरपूर कॅल्शियम मिळेल-ताकद येईल

४) तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात एका मागोमाग एक मेदूवडे सोडून ते खमंग होईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत गरमागरम रव्याचे मेदू वडे.

१ वाटी पोह्यांची करा कुरकुरीत-काटेरी चकली; २० मिनिटांत खमंग चकली करण्याची सोपी रेसिपी

५) रव्याचे मेदू वडे तुम्ही सकाळच्या  किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला  खाऊ शकता. दुपारच्या जेवणात ताटात वाढण्यासाठी हे वडे उत्तम पर्याय आहेत.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स