Lokmat Sakhi >Food > बेसनाच्या भजींनी त्रास होतो? मग करा कपभर रव्याची भजी, अशी कुरकुरीत भजी तुम्ही खाल्ली नसतील..

बेसनाच्या भजींनी त्रास होतो? मग करा कपभर रव्याची भजी, अशी कुरकुरीत भजी तुम्ही खाल्ली नसतील..

Instant Rava Pakoda, best recipe for Snacks : बेसनाचीच कशाला आता रव्याचीही भजी करुन पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2023 12:20 PM2023-10-09T12:20:34+5:302023-10-09T12:21:55+5:30

Instant Rava Pakoda, best recipe for Snacks : बेसनाचीच कशाला आता रव्याचीही भजी करुन पाहा

Instant Rava Pakoda, best recipe for Snacks | बेसनाच्या भजींनी त्रास होतो? मग करा कपभर रव्याची भजी, अशी कुरकुरीत भजी तुम्ही खाल्ली नसतील..

बेसनाच्या भजींनी त्रास होतो? मग करा कपभर रव्याची भजी, अशी कुरकुरीत भजी तुम्ही खाल्ली नसतील..

भजी खायला काळवेळ लागत नाही. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत आवडीने भजी (Pakoda) खाल्ली जाते. भजी अनेक प्रकारची केली जाते. बटाटा भजी, कांदा भजी, मूग डाळीची भजी आपण खाल्लीच असेल. सहसा भजी करण्यासाठी बेसनाच्या पिठाचा वापर केला जातो. पण आपण कधी रव्याची भजी ट्राय करून पाहिली आहे का?

रव्याचा उपमा, शिरा, इडली, मेदू वडा, डोसा तर आपण खाल्लंच असेल. पण आता हटके रव्याची भजी ट्राय करून पाहा. अनेकदा घरात बेसनाचे पीठ उपलब्ध नसते. जर अशा वेळी भजी खाण्याची क्रेविंग्स होत असतील तर, रव्याची भजी (Semolina Fritters) करून खा. मुख्य म्हणजे रव्याची भजी झटपट तयार होते. घरी अचानक पाहुणे आले असतील तर, त्यांच्यासाठी आपण खास रव्याची भजी तयार करून देऊ शकता. रव्याची भजी कशी तयार करायची? पाहूयात(Instant Rava Pakoda, best recipe for Snacks).

रव्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

मीठ

दही

कांदा

आलं-लसूण पेस्ट

चिली फ्लेक्स

हात न लावता गरमागरम बटाटे सोलण्याची हटके ट्रिक, बटाटे सोलूनही निघतील-मॅशही होतील

कोथिंबीर

तेल

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप रवा घ्या. त्यात चवीनुसार मीठ, अर्धा कप दही, एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एक टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, अर्धा टेबलस्पून चिली फ्लेक्स आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकजीव करा. त्यानंतर पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा. ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी पीठ तयार करतो, त्याचप्रमाणे पीठ तयार करायचे आहे. सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून रवा फुलेल. ५ मिनिटानंतर त्यात चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करा.

साबुदाणा न भिजवता-बटाटा न उकडता करा साबुदाण्याचे कुरकुरीत वडे, नवरात्रासाठी झटपट उपवास रेसिपी

दुसरीकडे कढईत भजी तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बॅटर चमच्याने सोडा, व भजी दोन्ही बाजूने भजी खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत रव्याची भजी खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Instant Rava Pakoda, best recipe for Snacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.