नाश्त्याला खाण्यासाठी खमन ढोकळा हा पारंपारीक गुजराती पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. ढोकळा खायला आवडतो असे खूपजण आहेत. (Cooking Hacks) लहान मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी ढोकळा उत्तम आहे. (Rice dhokla Recipe) बेसन ढोकळा, रवा ढोकळा, खट्टा ढोकळा, पनीर ढोकळा, झटपट ढोकळा अशा अनेक प्रकारे ढोकळा बनवला जातो. मऊ, तोंडात टाकताच विरघळणारा ढोकळा बनवण्यासाठी काही सोप्या कुकींग ट्रिक्स माहित असतील तर नाश्त्याची रंगत वाढू शकते. (Rice dhokla Recipe)
साहित्य-
३०० ग्रॅम तांदळाचे पीठ
३० ग्रॅम रवा
अर्धा कप दही
चवीनुसार साखर
४ चमचे तेल
१/२ टीस्पून मोहरी
१-२ अख्ख्या लाल मिरच्या
चिमूटभर हिंग
पाणी आवश्यक
चवीनुसार मीठ
१ चमचा लिंबाचा रस.
कृती
१) तांदळाचं पीठ, रवा, मीठ, बेसन पीठ, दही, साखर, तेल घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर या मिश्रणाची पेस्ट बनवा. तयार बॅटरमध्ये लागेल तसं पाणी मिसळून मिश्रण बनवा. त्यात लिंबाचा रस आणि हिंग घालून हे पीठ रात्रभर तसंच राहू द्या आणि स्टीमर गॅसवर ठेवा आणि पाणी उकळू द्या.
२) बॅटर तयार झालेल्या ढोकळ्याच्या प्लेटमध्ये ठेवा आणि २० मिनिटासाठी वाफवून घ्या. त्यानंतर स्टिमर गॅसवरून बाजूला करून ढोकळा काढून थंड करा.
३) कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला, तडतडायला लागल्यावर अख्ख्या लाल मिरच्या त्यात घाला. त्याचा रंग बदलल्यावर त्यात २ चमचे पाणी घाला, उकळू द्या आणि नंतर कापलेल्या तुकड्यांवर ही फोडणी घाला.