Lokmat Sakhi >Food > डाळ-तांदूळ न भिजवता, पीठ न आंबवता फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट हलकीफुलकी इडली

डाळ-तांदूळ न भिजवता, पीठ न आंबवता फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट हलकीफुलकी इडली

Instant Rice Flour Idli Recipe in 10 Mins - No Soaking, No Grinding & No Fermentation | Quick Idli फक्त दीड वाटी तांदुळाच्या पीठाची करा मस्त गरमागरम इडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 03:22 PM2023-07-18T15:22:32+5:302023-07-18T15:23:31+5:30

Instant Rice Flour Idli Recipe in 10 Mins - No Soaking, No Grinding & No Fermentation | Quick Idli फक्त दीड वाटी तांदुळाच्या पीठाची करा मस्त गरमागरम इडली

Instant Rice Flour Idli Recipe in 10 Mins - No Soaking, No Grinding & No Fermentation | Quick Idli | डाळ-तांदूळ न भिजवता, पीठ न आंबवता फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट हलकीफुलकी इडली

डाळ-तांदूळ न भिजवता, पीठ न आंबवता फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट हलकीफुलकी इडली

दिवसाची सुरुवात चांगल्या व निरोगी आहाराने करायला हवी. पौष्टीक नाश्ता खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. धकाधकीचे जीवन, रात्री उशिरा झोपणे, सकाळी लवकर उठून कामासाठी पळणे, या सगळ्या गोष्टींमुळे अनेकांना चविष्ट नाश्ता करायला मिळत नाही. नाश्त्याला अनेक जण पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदु वडा हे पदार्थ खातात. मात्र, अनेकांना नाश्त्याला इडली खायला आवडते. इडली आरोग्यासाठी खूप हेल्दी असते. परंतु, ती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

डाळ - तांदूळ भिजत घालण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंत, याची प्रोसेस खूप मोठी आहे. जर आपल्याला झटपट व कमी साहित्यात इडली तयार करायची असेल तर, तांदळाच्या पिठाच्या इडल्या ट्राय करून पाहा(Instant Rice Flour Idli Recipe in 10 Mins - No Soaking, No Grinding & No Fermentation | Quick Idli).

तांदळाच्या पिठाची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदळाचे पीठ

रवा

मीठ

श्रावण स्पेशल : बटाटा न घालता करता येतो क्रिस्पी साबुदाणा वडा, उपवासाला चमचमीत बेत

दही

पाणी

तेल

कृती

सर्वप्रथम, एका या बाऊलमध्ये दीड कप तांदळाचे पीठ घ्या, त्यात अर्धा कप रवा, अर्धा चमचा मीठ, एक कप दही, व अर्धा कप पाणी घालून साहित्य एकजीव करा. आपण त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करू शकता. २ मिनिटापर्यंत पीठ चमच्याने किंवा बिटरने ढवळत राहा. आता त्यावर १० मिनिटांसाठी कापड झाकून बाजूला ठेवा. १० मिनिटानंतर पुन्हा चमच्याने २ मिनिटासाठी बॅटर ढवळून घ्या. ज्याप्रमाणे आपण इडली करण्यासाठी बॅटर तयार करतो, त्याच प्रमाणे बॅटरमध्ये घट्टपणा ठेवायचा आहे. त्यानंतर त्यात अर्धा चमचा इनो किंवा फ्रुट सॉल्ट घालून मिक्स करा.

१ कप गव्हाचं पीठ - अर्धा कप रवा, १० मिनिटांत करा गव्हाचा कुरकुरीत डोसा

दुसरीकडे इडली ट्रे ला तेल लावून ग्रीस करा, त्यावर तयार बॅटर चमच्याने घाला. त्यानंतर ट्रे इडली स्टीमरमध्ये ठेऊन १० मिनिटापर्यंत इडली शिजवून घ्या. अशा प्रकारे तांदळाच्या पिठाची इन्स्टंट इडली खाण्यासाठी रेडी.

Web Title: Instant Rice Flour Idli Recipe in 10 Mins - No Soaking, No Grinding & No Fermentation | Quick Idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.