दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती मधील मुरुक्कू (Murukku) हा एक पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. मुरुक्कू हे प्रामुख्याने तांदळाच्या पीठापासून बनवले जातात. परंतु बदलत्या काळानुसार मुरुक्कू हे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, पीठ वापरुन अनेक प्रकारच्या फ्लेवरमध्ये देखील केले जातात. संध्याकाळचा गरमागरम चहा आणि कुरकुरीत मुरुक्कू हे खायला अतिशय टेस्टी लागतात. या मुरुक्कूचा आकार हा गुंतागुंतीच्या वेटोळ्यांसारखा असतो आणि तमिळ भाषेत मुरुक्कू म्हणजे वेटोळी. म्हणून त्यांना मुरुक्कू असे नाव पडले(Murukku Recipe).
संध्याकाळची भूक भागवण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना काही ना काही स्नॅक्स हवे असते. रोज ठराविक पदार्थ खायला कोणालाच आवडत नाही. अशावेळी जर आपण चहासोबत काहीतरी नवीन, कुरकुरीत, क्रिस्पी खाण्याचा विचार करत असाल तर मुरुक्कू हा बेस्ट ऑप्शन आहे. टी टाईमच्या वेळी अनेकांना चटपटीत, कुरकुरीत, मसालेदार स्नॅक्स खायला आवडतात. परंतु काहीवेळा काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल काय खावे याचा विचार करतो. अशावेळी आपण हे मुरुक्कू (Murukku Recipe Crunchy Rice Flour Spirals) खाऊ शकतो. मुरुक्कू बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Indian Style Murukku Recipe).
साहित्य :-
१. तांदुळाचे पीठ - ५०० ग्रॅम
२. चण्याची डाळ - १२५ ग्रॅम (कोरडी भाजून घेतलेली)
३. हळद - १/२ टेबलस्पून
४. लाल मिरची पावडर - २ टेबलस्पून
५. कलौंजी - १ टेबलस्पून
६. ओवा - १ टेबलस्पून
७. मीठ - गरजेनुसार
८. बटर - २ टेबलस्पून
९. पाणी - गरजेनुसार (उकळवून घेतलेले गरम पाणी)
१०. तेल - गरजेनुसार
वर्षभर टिकेल अशी टोमॅटोची पावडर करा घरीच, भाजी- आमटीला येईल सुंदर स्वाद.. ताज्या टोमॅटोची चव...
दुधावर ठेवण्याची जाळी स्वच्छ - चकचकीत करण्याचा सोपा उपाय, काळी झालेली जाळी दिसेल नव्यासारखी...
कृती :-
१. सगळ्यांत आधी मिक्सरच्या भांड्यात भाजलेली चण्याची डाळ घेऊन ती व्यवस्थित बारीक होईपर्यंत वाटून घ्यावी. चण्याची डाळ वाटून घेतल्यानंतर ती चाळून घ्यावी.
२. आता एका मोठ्या भांड्यात तांदुळाचे पीठ घेऊन त्यात डाळीचे पीठ मिक्स करावेत.
३. त्यानंतर त्यात हळद, लाल मिरची पावडर, कलौंजी, ओवा, चवीनुसार मीठ, बटर घालून घ्यावे.
४. सगळ्यांत शेवटी या मिश्रणात गरजेनुसार गरम पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
५. आता हे पीठ चकली पाडायच्या साच्यात घालून त्याचा गोल आकार येईल असे शेवप्रमाणे मुरुक्कू पाडून घ्यावे.
६. गरम तेलात हे मुरुक्कू सोडून खरपूस तळून घ्यावेत.
गरमागरम, खरपूस मुरुक्कू खाण्यासाठी तयार आहेत.