Lokmat Sakhi >Food > नैवेद्य दाखवायचाय, वेळ कमी आहे? १० मिनिटांत घरीच करा रबडीसारखी खीर; पटकन बनेल नैवेद्य

नैवेद्य दाखवायचाय, वेळ कमी आहे? १० मिनिटांत घरीच करा रबडीसारखी खीर; पटकन बनेल नैवेद्य

Instant Rice Kheer In Just 10 Minutes : ही खीर बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही मोजकं साहित्य वापरून ही खीर तयार होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:27 PM2023-09-11T13:27:54+5:302023-09-14T12:29:46+5:30

Instant Rice Kheer In Just 10 Minutes : ही खीर बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही मोजकं साहित्य वापरून ही खीर तयार होईल.

Instant Rice Kheer In Just 10 Minutes : Instant Rice Kheer Recipe How to Make Kheer Quickly | नैवेद्य दाखवायचाय, वेळ कमी आहे? १० मिनिटांत घरीच करा रबडीसारखी खीर; पटकन बनेल नैवेद्य

नैवेद्य दाखवायचाय, वेळ कमी आहे? १० मिनिटांत घरीच करा रबडीसारखी खीर; पटकन बनेल नैवेद्य

श्रावण महिन्यात बरेच उपवास-तापास सुरू असतात. खास प्रसंगाना आणि सणाच्या दिवशी घरात गोड-धोड पदार्थ बनवले जातात पण नेहमी शीरा आणि त्याच त्याच चवीचे पदार्थ बनवण्यापेक्षा तुम्ही नवीन चवीचे पदार्थ ट्राय करू शकता. (How to Make Kheer Quickly) यामुळे नैवेद्यासाठी उत्तम पदार्थ तयार होईल आणि घरातील सगळेजण आवडीने खीर खातील. ही खीर बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही मोजकं साहित्य वापरून ही खीर तयार होईल. (Rice Kheer Recipe)

साहित्य

१) साजूक तूप - ३ ते ४ चमचे

२) काजू- ७ ते ८

३) बदाम- ७ ते ८

४)  पिस्ता -  ४ ते ५

५)  मनूके- ४ ते ५

६) भिजवलेले तांदूळ - १ वाटी

७) दूध - १ लिटर

८) वेलची पावडर - १ चमचा

९) केसर दूध - २ ते ३ चमचे

१०) साखर - १ वाटी

११) किसलेलं नारळ- २ चमचे

कृती

१) ड्रायफ्रुट्स खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत तूप घाला. मंद आचेवर तूप ठेवून त्यात काजूचे काप, बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि मनूके तळून घ्या. तळलेले ड्रायफुट्स एका ताटात काढून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून परतून घ्या तुम्ही गरजेनुसार अजून तूप त्यात घालू शकता. 

टपरीसारखा चहा घरी करण्याचं 'सोपं सिक्रेट'; कडक-जाडसर चहा, एक घोट घेताच मन होईल तृप्त

२) तांदूळ व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात १ ग्लास दूध घाला. दूध घालून चमच्याच्या साहाय्याने दूध व्यवस्थित ढवळून घ्या. त्यात वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. दूधाला उकळ फुटल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घ्या. त्यात केशरचं दूध घाला.

३) दूध आणि तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात  साखर घाला. साखर घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्या.  साखर वितळ्यानंतर  त्यात ड्रायफ्रुट्स आणि नारळाचा किस घालून खीर सर्व्ह करा. 

मार्केटसारखा मऊ, फुललेला रवा ढोकळा झटपट घरीच करा; पांढराशुभ्र ढोकळा खा-तोंडाला येईल चव

४) तांदळाची खीर परफेक्ट बनण्यासाठी कढईत थंड दूध घालू नका. दूध रूम टेम्परेचरवर किंवा कोमट असावं.  ड्रायफ्रुट्सचे तुकडे करण्याऐवजी बारीक किसून घातले तर त्याची चव आणखी वाढेल.

Web Title: Instant Rice Kheer In Just 10 Minutes : Instant Rice Kheer Recipe How to Make Kheer Quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.