Join us  

१ कप चणा डाळ भाजून करा इन्स्टंट खुसखुशीत चकली, झटपट चकली करायलाही सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 12:34 PM

Instant Roasted Chana Dal & Rice flour Chakli : भाजणीची चकली करायला वेळ नसेल तर, यंदा भाजलेल्या चणा डाळीची इन्स्टंट क्रिस्पी चकली करून पाहा

संपूर्ण देशभरात धुमधडाक्यात दिवाळी या सणाला जय्यत तयारी सुरु झाली आहे. काहींची साफसफाई पूर्ण झाली आहे. तर, काहींनी फराळ करायला देखील सुरुवात केली. आता काही दिवसांवर दिवाळी या सणाला सुरुवात होईल. घराघरांमधून फराळाचा, भाजण्यांचा सुगंध येऊ लागला आहे. मात्र, अनेकांना फराळ तयार करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्या झटपट इन्स्टंट पद्धतीचा फराळ तयार करतात. चकली अनेक प्रकारची केली जाते.

काही जण भाजणी, पोहे, तांदळाच्या पिठाची चकली तयार करतात. जर आपल्याला इन्स्टंट चकली तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. इन्स्टंट पद्धतीची ही चकली चवीला तर भन्नाट लागतेच शिवाय करतानाही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. चला तर मग इन्स्टंट चकली कशी तयार करायची पाहूयात(Instant Roasted Chana Dal & Rice flour Chakli).

इन्स्टंट चकली करण्यासाठी लागणारं साहित्य

भाजलेली चणा डाळ

तांदुळाचं पीठ

हळद

लाल तिखट

धणे पूड

सकाळी वेळ नाही म्हणून रात्रीच पीठ मळून ठेवता? फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या खाणं योग्य की अयोग्य?

जिरे पूड

हिंग

मीठ

पांढरे तीळ

तेल

पाणी

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक कप भाजलेली चणा डाळ घ्या, त्याची बारीक पावडर तयार करा. एका बाऊलवर चाळण ठेवा, त्यावर चणा डाळीची तयार पावडर घालून चाळून घ्या. नंतर त्यात २ कप तांदुळाचं पीठ, चिमुटभर हळद, २ चमचे लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड, चिमुटभर हिंग, चवीनुसार मीठ, एक छोटी वाटी पांढरे तीळ व एक चमचा गरम तेल ओतून साहित्य एकत्र करा. नंतर त्यात गरजेनुसार कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून कणिक मऊ होईल.

तळलेल्या जाड पोह्यांचा करा कुरकुरीत खमंग चिवडा, चटकदार चिवडा-टिकेल महिनाभर फ्रेश

दुसरीकडे चकलीच्या सोऱ्याला तेलाचा हात लावून घ्या. नंतर त्यात कणकेचा एक गोळा दाबून भरा, व चकली एका प्लेट किंवा पेपरवर पाडून घ्या. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चकली सोडून दोन्ही बाजूने मध्यम आचेवर तळून घ्या. अशा प्रकारे इन्स्टंट क्रिस्पी चकली खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.