Lokmat Sakhi >Food > साबुदाणा भिजत न घालता कुरकुरीत चकली करा इन्स्टंट; फक्त १५ मिनिटात उपवासाची चकली रेडी

साबुदाणा भिजत न घालता कुरकुरीत चकली करा इन्स्टंट; फक्त १५ मिनिटात उपवासाची चकली रेडी

Instant Sabudana Chakli Recipe / Maharashtrian Chakli : नवरात्रीनिमित्त एकदा साबुदाण्याची चकली करून पाहाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2024 04:06 PM2024-09-29T16:06:35+5:302024-09-29T16:07:37+5:30

Instant Sabudana Chakli Recipe / Maharashtrian Chakli : नवरात्रीनिमित्त एकदा साबुदाण्याची चकली करून पाहाच

Instant Sabudana Chakli Recipe / Maharashtrian Chakli | साबुदाणा भिजत न घालता कुरकुरीत चकली करा इन्स्टंट; फक्त १५ मिनिटात उपवासाची चकली रेडी

साबुदाणा भिजत न घालता कुरकुरीत चकली करा इन्स्टंट; फक्त १५ मिनिटात उपवासाची चकली रेडी

आता काही दिवसात नवरात्रीला सुरुवात होईल (Sabudana Chakli). नवरात्र (Navratri) म्हटलं की सर्वत्र रंगीबेरंगी कपडे, दांडिया नाईट्स आणि देवीचा जागर पाहायला मिळतो. या नऊ दिवसात काही जण उपवासही धरतात (Cooking tips). उपवासाला महिलावर्ग साबुदाण्याचे पदार्थ किंवा फळाहार करतात (Food).

साबुदाण्याचे बरेच पदार्थ केले जातात. साबुदाण्याची खिचडी, वडे किंवा खीर आवडीने खाल्ली जाते. पण आपण कधी साबुदाण्याची चकली करून पाहिली आहे का? साबुदाण्याची कुरकुरीत चकली आपण साबुदाणा भिजत घालून करतो. पण जर आपण साबुदाणा भिजत घालायला विसरले असाल तर, या पद्धतीने इन्स्टंट कुरकुरीत चकली करून पाहा. अगदी काही मिनिटात चकल्या तयार होतील(Instant Sabudana Chakli Recipe / Maharashtrian Chakli).

साबुदाण्याची इन्स्टंट कुरकुरीत चकली करण्यासाठी लागणारं साहित्य


साबुदाणा

बटाटे

मीठ

साडीवर फॅशनेबल ब्लाऊज शिवायचंय? बघा मागच्या गळ्याचे ९ स्टायलिश डिझाइन्स- साडी नेसून दिसाल ग्लॅमरस

काळी मिरी पावडर

तेल

कृती

सर्वात आधी प्रेशर कुकरमध्ये ३ कप पाणी आणि २ बटाटे घाला. प्रेशर कुकरमध्ये बटाटे झटपट शिजतात. एका शिट्टीनंतर गॅस बंद करा. 
मिक्सरच्या भांड्यात एक कप साबुदाणा घेऊन त्याची पावडर तयार करा. एका मोठ्या ताटात उकडून घेतलेले बटाटे किसून घ्या. त्यात साबुदाण्याची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून हाताने सर्व साहित्य मळून घ्या.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

चकली करण्याचा साचा घ्या. त्यात तयार गोळा भरून चकल्या पाडून घ्या. दुसरीकडे कढईमध्ये तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चकल्या सोडून दोन्ही बाजूने कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत साबुदाणा चकली खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Instant Sabudana Chakli Recipe / Maharashtrian Chakli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.