उन्हाळा सुरू झाल्यानंतर तांदूळ, नाचणी, ज्वारीचे तर कोणी पोह्याचे पापड बनवतं. यासोबतच उपवासाला खाल्ले जाणारे बटाटा-साबुदाण्याचे पापडही बनवले जातात. (Cooking Hacks) हे पापड एकदा केले की वर्षभर टिकतात. मधल्यावेळेत खाण्यासाठी किंवा उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी हे पापड उत्तम ऑपश्न आहेत. (Instant Sabudana Papad Upvasache Sabudana Papad)
साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी सगळ्यात आधी दीड किलो किंवा दोन किलो तुम्हाला जितके पापड बनवायचे असतील तितकं साबुदाण्याचं पीठ दळून घ्या. हे पीठ दळल्यानंतर पाण्यात मिक्स करा. व्यवस्थित ढवळलं जाण्यासाठी तुम्ही त्यात अजून पाणी घालू शकता.
झटपट खमंग मेदूवडे करण्यासाठी ३ ट्रिक्स; मेदूवडा कधी बिघडणार नाही तेलकटही होणार नाही
हे मिश्रण उकळायला ठेवा. यात जिऱ्याची पावडर, मीठ घाला. नंतर गॅस बंद करून एका प्लास्टीकच्या पेपरला तेल लावून पळी पापड मध्यम आकाराचे घालून सुकवायला ठेवा. १ ते २ दिवस सुकवल्यानंतर तयार होतील साबुदाण्याचे कुरकुरीत पापड