Join us  

ग्रीन ढोकळा कधी खाल्लाय का? कपभर बेसन-पालकाची करा उत्कृष्ट रेसिपी-पालक न खाणारेही आवडीने खातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 12:06 PM

Instant Spinach Dhokla, Green Healthy Dhokla for Breakfast : पिवळाधमक ढोकळा खाल्लाच असेल तर, आता ग्रीन ढोकळा ट्राय करा. हेल्दी रेसिपी-तयार होते १५ मिनिटात

दिवसातील मुख्य आहार म्हणजे नाश्ता. पोटभर हेल्दी  ब्रेकफास्ट केल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. त्यामुळे बरेच जण सकाळी नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, पराठा, साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खातात. अनेकांना नाश्त्यामध्ये गुजराथी पदार्थ खायला आवडतात. बरेच जण ब्रेकफास्टमध्ये हेल्दी, स्पंजी ढोकळा खाण्यास पसंती दर्शवतात.

पिवळाधमक, स्पंजी-सॉफ्ट ढोकळा आपण खाल्लाच असेल. काही जण रव्याचा देखील ढोकळा तयार करतात. पण आपण ग्रीन ढोकळा ट्राय करून पाहिलं आहे का? ग्रीन ढोकळा फक्त दिसायला आकर्षक नसून, खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी देखील हेल्दी असते. कारण यात पालकाचा वापर होतो. चला तर मग ग्रीन ढोकळा कसा तयार करायचा पाहूयात(Instant Spinach Dhokla, Green Healthy Dhokla for Breakfast ).

ग्रीन हेल्दी ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

पालक

बेसन

आलं

पाणी

गुळ

लिंबाचा रस

छोटा भीम खातो ते टूनटून मावशीचे लाडू आता तुम्हीही करा घरीच, पाहा मस्त सोपी झटपट रेसिपी

तेल

बेकिंग सोडा

जिरं

मोहरी

कढीपत्ता

पांढरे तीळ

लाल सुक्या मिरच्या

हिंग

नारळ पाणी

कृती

सर्वप्रथम, पालक शिजवून त्याची प्युरी तयार करा. एका बाऊलमध्ये दोन कप बेसन घ्या. त्यात पालकाची प्युरी घाला. नंतर त्यात ठेचलेलं आलं, एक कप दही व थोडं पाणी घालून सर्व साहित्य एकजीव करा. ज्याप्रमाणे आपण ढोकळ्यासाठी बॅटर तयार करतो, त्याचप्रमाणे ढोकळा बॅटर रेडी करा. नंतर त्यात अर्धा कप गुळ, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा तेल आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून सर्व साहित्य एका बाजूने ढवळत राहा.

स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. एक भांडं घ्या, त्याला ब्रशने तेल लावून ग्रीस करा. नंतर भांड्यात ग्रीन बॅटर ओता, व भांडं स्टीमरमध्ये ठेऊन त्यावर झाकण ठेवा. १५ मिनिटानंतर ढोकळा शिजला आहे की नाही हे चेक करा. नंतर भांडं थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवा. ढोकळा थंड झाल्यानंतर त्याचे चौकोनी काप करा.

पारंपरिक आगरी पद्धतीची भाकरी करताना लक्षात ठेवा १ युक्ती, भाकरी होईल मस्त

दुसरीकडे एका कढईत २ चमचे तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक छोटा चमचा जिरं, मोहरी, कडीपत्ता, पांढरे तीळ, लाल सुक्या मिरच्या आणि चिमुटभर हिंग घालून परतवून घ्या.  सहसा आपण फोडणीत पाणी घालतो, पण पाणी घालण्याऐवजी नारळ पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर, तयार फोडणी ढोकळ्यावर पसरवून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे ग्रीन ढोकळा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स