सकाळचा हेल्दी नाश्ता (Breakfast) करायलाच हवा. नाश्ता केल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. शिवाय आपले आरोग्य सुदृढ राहते. आपल्या भारतात अनेक प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ केले जातात. साऊथ इंडियन पदार्थ, गुजराथी स्पेशल नाश्ता, चपाती-भाजी, यासह उपमा, पोहे देखील आवडीने केले जातात. काहींची सकाळ डोसा (Dosa) आणि इडली या पदार्थाने होते.
डाळ-तांदूळ भिजत घातल्यानंतर त्याचे डोसे केले जातात. पण डोसा करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. काही जण इन्स्टंट डोसेही तयार करतात. पण जर आपल्याला हेल्दी डोसा आणि त्यात हटके ट्विस्ट हवा असेल तर (Cooking Tips), आपण पालक-कडधान्यांचा डोसा (Palak-Sprouts Dosa) तयार करू शकता. कडधान्य आणि पालक खाण्याचे अनेक पौष्टीक फायदे आहेत. जर आपण वेट लॉस करत असाल तर, या प्रकारचा डोसा एकदा नक्कीच तयार करून पाहा(Instant Sprouts and spinach dosa recipe).
मिक्स कडधान्य-पालकाचा चविष्ट डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
कडधान्य
पालक
लसूण
हिरवी मिरची
आलं
मीठ
जिरं
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात १ कप भिजलेले मिक्स कडधान्य (मुग, मटकी, चणे), ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, फ्रेश पालक, आल्याचा एक तुकडा, चवीनुसार मीठ, एक चमचा जिरं आणि थोडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ज्याप्रमाणे आपण डोश्यासाठी बॅटर तयार करतो, त्याचप्रमाणे बॅटर तयार करा. तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्या.
नॉन स्टिक तवा पॅन गरम करण्यासाठी ठेवा. तव्यावर पाणी शिंपडा, नंतर त्यावर थोडे तेल लावा. चमचाभर बॅटर तव्यावर घालून पसरवा, मग त्यावर १ ते २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. २ मिनिटानंतर डोसा हळूवारपणे पलटी करा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे मिक्स कडधान्य-पालकाचा चविष्ट क्रिस्पी डोसा खाण्यासाठी रेडी.