Join us  

आत्ताच्या आता गरम डोसा खाण्याची इच्छा झाली. करा इन्स्टंट डोसा गव्हाच्या पिठाचा, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 10:00 AM

Instant Wheat Dosa Recipe in 10 Minutes : गव्हाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा खाऊन तर पाहा..

नाश्ता म्हटलं की पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ आवर्जून खातात (Cooking Tips). साउथ इंडियन पदार्थांमध्ये इडली, डोसा, मेदूवडे चवीला भन्नाट आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात (Wheat Dosa). पण डाळ - तांदूळ भिजत घालून इडली - डोसा नेहमी करायला जमेल असे नाही. हे पदार्थ करण्याची प्रोसेस खूप मोठी असते.

जर आपल्याला डोसा खाण्याची इच्छा झाली असेल आणि डाळ - तांदूळ भिजत घालायला विसरले असाल तर, कपभर गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा करून पाहा. नाश्त्यामध्ये काहीतरी ट्विस्ट म्हणून आपण गव्हाच्या पिठाचा डोसा करून पाहू शकता. कमी वेळात कुरकुरीत डोसा तयार होईल(Instant Wheat Dosa Recipe in 10 Minutes).

गव्हाच्या पिठाचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

तांदुळाचं पीठ

मीठ

ओवा

काळे तीळ

चिली फ्लेक्स

मुलांच्या बळकट हाडांसाठी फक्त दूध पुरेसं नाही, चमचाभर ‘ही’ पावडर दुधात घाला, हाडं होतील मजबूत

हिरवी मिरची

कोबी

कोथिंबीर

पाणी

तेल

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ, छोटा चमचा ओवा, काळे तीळ, चिली फ्लेक्स, ३ ते ४ बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, बारीक चिरलेली कोबी, कोथिंबीर आणि पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा. ज्याप्रमाणे आपण डोश्यासाठी बॅटर तयार करतो, त्याच पद्धतीचे बॅटर रेडी करा.

कपभर दही आणि उरलेल्या चपात्यांचे करा चटपटीत चाट; १० मिनिटात डिश रेडी; खा पोटभर

पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर एक चमचा तेल घाला आणि पसरवा. त्यावर चमचाभर बॅटर ओतून पसरवा. त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा, व दोन्ही बाजूने डोसा भाजून घ्या. अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स