नाश्त्याला आपण आवडीने उपमा, पोहे किंवा साउथ इंडियन पदार्थ (South Indian Dishes) खातो. जर हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खायचे असेल तर, आपण आवर्जून दाक्षिणात्य पदार्थ खातो. दाक्षिणात्य पदार्थांमध्ये बऱ्याच जणांना डोसा हा पदार्थ आवडतो. डोश्यामध्ये अनेक प्रकार आहेत. काही जण डाळ-तांदुळाचे डोसे तयार करतात. तर काही जण झटपट पद्धतीचा इन्स्टंट डोसा तयार करतात. बऱ्याचदा डोसा खाण्याची इच्छा होते (Instant Dosa Recipe). पण डाळ-तांदूळ भिजत घालण्यापासून ते आंबवण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. ज्यामुळे बरेच जण घरात कवचित इडली-डोसे तयार करतात.
जर आपल्याला घरगुती डोसा खाण्याची इच्छा झाली असेल तर, कपभर गव्हाचं पीठ आणि रव्याचा इन्स्टंट डोसा तयार करा (Cooking Tips). चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा इन्स्टंट डोसा आपल्याला नक्कीच आवडेल(Instant Wheat Flour Dosa Recipe).
गव्हाच्या पिठाचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
गव्हाचं पीठ
रवा
तेल
हिरवी मिरची
फक्त एका शिट्टीत कुकरमध्ये करा पास्ता, ५ मिनिटांत गरमागरम हॉटेलस्टाइल पास्ता करण्याची भन्नाट रेसिपी
आलं
कोथिंबीर
मीठ
कांदा
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्या, नंतर त्यात एक कप रवा, २ चमचे तेल, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा. ज्याप्रमाणे आपण घावणाचे बॅटर तयार करताना पीठ तयार करतो, त्याचप्रमाणे सरसरीत बॅटर तयार करा. तयार बॅटरवर १० ते १५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून रवा भिजेल.
२ गाजराचे करा चमचमीत लोणचे, चव चटकदार-कराल जेवण पोटभर
दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. तव्याला ब्रशने थोडे तेल लावा. त्यावर चमच्याने बॅटर ओता, आणि कडेने चमचाभर तेल सोडा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने डोसा खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा खाण्यासाठी रेडी. आपण या डोश्याचा आस्वाद चटणी किंवा सांबारसोबत लुटू शकतात.