Lokmat Sakhi >Food > इडली -डोशाचे पीठ छान आंबावे म्हणून त्यात सोडा घालता? तज्ज्ञ सांगतात, ते तातडीने बंद करा कारण...

इडली -डोशाचे पीठ छान आंबावे म्हणून त्यात सोडा घालता? तज्ज्ञ सांगतात, ते तातडीने बंद करा कारण...

Is adding baking soda to your dosa batter harmful for health? What experts say : इडली-डोशाच्या पिठात सोडा आणि अजून बाजारातील ॲण्टासिड पावडरी घालणं धोक्याचं असं तज्ज्ञ का म्हणतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 09:30 AM2023-04-28T09:30:04+5:302023-04-28T09:35:02+5:30

Is adding baking soda to your dosa batter harmful for health? What experts say : इडली-डोशाच्या पिठात सोडा आणि अजून बाजारातील ॲण्टासिड पावडरी घालणं धोक्याचं असं तज्ज्ञ का म्हणतात?

Is adding baking soda to your dosa batter harmful for health? What experts say | इडली -डोशाचे पीठ छान आंबावे म्हणून त्यात सोडा घालता? तज्ज्ञ सांगतात, ते तातडीने बंद करा कारण...

इडली -डोशाचे पीठ छान आंबावे म्हणून त्यात सोडा घालता? तज्ज्ञ सांगतात, ते तातडीने बंद करा कारण...

इडली, डोसा हे आपल्या सगळ्यांच्याच अतिशय आवडीचे पदार्थ आहेत. बऱ्याचदा हे पदार्थ आपल्या घरी नाश्त्याला बनवले जातात. आपल्यापैकी बऱ्याच घरात इडली, डोसा हे पदार्थ नाश्त्याला किंवा जेवणाला आवडीने ताव मारुन खाल्ले जातात. इडली, डोसा हे असे पदार्थ आहेत की ते फुलून मऊ, लुसलुशीत बनले तरच ते खायला मजा येते. इडली न फुलता दडदडीत झाली किंवा डोसा मऊ स्पंजसारखा नरम झाला नाही तर हे पदार्थ खायची इच्छाच होत नाही. यासाठी इडली, डोसा विकतच्यासारखे मऊ, लुसलुशीत व्हावे यासाठी अनेक गृहिणी नेहमी असंख्य उपाय करण्यात प्रयत्नशील असतात. इडली, डोसा मस्त सॉफ्ट, नरम व्हावा यासाठी पीठ एका विशिष्ट्य पद्धतीने रात्रभर आंबवले जाते, तांदूळ व डाळींचे योग्य प्रमाण घेतले जाते किंवा हे बॅटर फुलून येण्यासाठी नानाविध शक्कल लढवल्या जातात. 

शक्यतो आपण इडली, डोसा यांचे बॅटर व्यवस्थित फुलून येण्यासाठी त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालतो. या बॅटरमध्ये इनो व बेकिंग सोडा घातल्यामुळे ते बॅटरमध्ये लगेच मिसळून पीठ आंबवण्याच्या प्रक्रियेला मदत करते. इडली, डोसा यांचे बॅटर फुलून येण्यासाठी त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालून ते कृत्रिमरीत्या फुगवून आणणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे. इनो किंवा बेकिंग सोड्याचा वापर करुन पीठ कृत्रिमरीत्या फुलून तर येते परंतु पीठ फुलून येण्यासाठी त्यात वारंवार इनो, बेकिंग सोडा घालणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का अयोग्य ? न्यूट्रिशनिस्ट जुही कपूर हिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरुन इडली, डोसा यांचे बॅटर फुलून येण्यासाठी त्यात इनो, बेकिंग सोडा घातल्याने त्याचे आपल्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होऊ शकतात, याबद्दल सांगितले आहे(Is adding baking soda to your dosa batter harmful for health? What experts say).

इनो, बेकिंग सोडा यांचे प्रमाण नेमके किती असावे ? 

आपण घरच्या घरी केक, मफिन्स, ब्रेड, इडली, डोसा बॅटर बनवताना त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालतो. हे सगळे पदार्थ बनवताना त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घातल्याने हे पदार्थ मऊ, लुसलुशीत आणि स्पंजसारखे सॉफ्ट बनण्यास मदत होते. वेगवेगळे पदार्थ बनवताना ते फुलून येण्यासाठी त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालावा परंतु त्याचे नेमके प्रमाण आहे. इनो किंवा बेकिंग सोडा यांच्या रोज सतत जेवणात वापर करणे हे चुकीचे आहे. कोणत्याही पदार्थामध्ये इनो, बेकिंग सोडा घालताना केवळ अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा इनोचा वापर करावा. त्यापेक्षा जास्त प्रमाणात वापरू नये. परंतु इनो व बेकिंग सोडा दररोज खूप जास्त प्रमाणात वापरणे आपल्या आरोग्याला खूपच हानिकारक ठरु शकते. who च्या सल्ल्यानुसार रोजच्या जेवणात सोडियमयुक्त पदार्थांचा वापर हा मर्यादित प्रमाणातच केला पाहिजे. इनो मध्ये ६० % सोडियम असते, त्यामुळे बेकिंग सोड्यापेक्षा इनोचा वापर करणे हे केव्हाही चांगलेच आहे. त्यामुळे अनेक अन्नपदार्थ फुलून येण्यासाठी त्यात बेकिंग सोड्यापेक्षा इनो चांगला पर्याय आहे. परंतु इनोचा वापर देखील प्रमाणातच करावा. गरजेपेक्षा जास्त इनोचा वापर करणे हे देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे. इनोचा वापर देखील थोड्याच प्रमाणात म्हणजेच अधूनमधून ५ ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणांत करु नये.

जाळीदार डोसे, लुसलुशीत इडली हवी? पाहा डाळ तांदूळ प्रमाण गणित, करा परफेक्ट साऊथ इंडियन पदार्थ...  

आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम :- 

१. ब्लड प्रेशर वाढते :- इनो आणि बेकिंग सोड्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते. 

२. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते :- रोजच्या जेवणात किंवा पदार्थात सतत इनो किंवा बेकिंग सोड्याचा वापर केल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅलर्जी व इंफेक्शन्स होण्याची शक्यता असते.      

३. किडनी संबंधित आजारांची समस्या :- जेवणात किंवा अन्नपदार्थात सोड्याचा वापर जास्त प्रमाणात केल्यास किडनी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. काहीवेळा इनो सारख्या एंटासिडचे सतत सेवन केल्यास किडनी फेलियर सारखे गंभीर आजार होण्याची संभावना असते. 

४. ब्लड शुगर वाढते :- इनो किंवा सोड्याचा वापर अधिक प्रमाणात केल्यास ते आपल्या स्वादुपिंडात इन्सुलिन तयार करते. त्यामुळे १५ ते २० मिनिटात आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. 

५. कमजोरी व थकवा येणे :- इनो व सोड्यामध्ये फॉस्फोरिक अ‍ॅसीडचे प्रमाण जास्त असते. यामुळे आपल्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होऊन पचनक्रिया मंदावू शकते. यामुळे आपण खाल्लेले ऍन नीट पचवण्यास मदत होत नाही. यामुळे आपल्याला शारीरिक कमजोरी व थकवा जाणवतो. 

उन्हाळ्यात घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी खास पदार्थ - ‘काकडीची बोट’! पौष्टिक आणि चमचमीत चव नक्की आवडेल...
 

इडली, डोशाचे बॅटर फुलून येण्यासाठी काय आहेत नैसर्गिक उपाय :- 

१. इडली, डोशाचे बॅटर एक दिवस आधी तयार करुन रात्रभर आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी ठेवावे. 

२. इडली, डोशाचे बॅटर फुलून येण्यासाठी त्यात मीठ घालावे. यामुळे नैसर्गिकरित्या बॅटर फुलून येते. 

३. बेकरी प्रॉडक्ट्स फुलून येण्यासाठी यीस्टचा वापर करावा.

Web Title: Is adding baking soda to your dosa batter harmful for health? What experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न