भारतातील बहुतांश लोकांना दही (Curd) खायला आवडते. लोकं सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत वाटीभर दही खातात. काहींना पदार्थात मिसळून दही खाण्याची सवय असते. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दही हा पोषक तत्वांचा खजिना आहे. हे कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन बी १२, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे.
मुख्य म्हणजे दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. काही जण दह्यात मीठ किंवा साखर मिसळून खातात. पण दह्यात मीठ किंवा साखर मिसळून खाणं योग्य आहे का?(Is curd healthy to eat with salt and Sugar).
दह्यात मीठ किंवा साखर मिसळून खावे का?
आयुर्वेदानुसार, दह्यात आम्लपित्त आढळते, जे खाल्ल्याने शरीरातील पित्त आणि कफ वाढते. मात्र दही वात कमी करते. परंतु, दह्यामध्ये मीठ घालून खाल्ल्यास पित्त आणि कफ वाढते. मीठ अँटी-बॅक्टेरियल आहे, जे दह्यामध्ये आढळणारे चांगले बॅक्टेरिया नष्ट करते. त्यामुळे दह्यामध्ये मीठ घालून खाऊ नका.
कपभर गव्हाचे पीठ आणि गूळ, करा पारंपरिक गोड कडाकण्या, अष्टमीला खास नैवेद्य
याशिवाय ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी दह्यात मीठ घालून खाऊ नये. कारण यामुळे रक्तदाब वाढते. याचबरोबर दह्यात मीठ मिसळून खाल्ल्याने स्ट्रोक, हृदयविकार, डिमेंशिया, हायपरटेंशनसारखे गंभीर आजार शरीरात निर्माण होऊ शकतात.
'या' लोकांनी दह्यात मीठ घालून खावे
अनेकदा दह्यामधील व्हिटॅमिन सीमुळे गॅसची समस्या निर्माण होते. ज्यांना याचा त्रास होतो, त्यांनी दह्यात चिमुटभर मीठ मिसळून खावे. ज्यांना डायबिटिज आहे, ते देखील दह्यात मीठ मिसळून खाऊ शकता.
दह्यात साखर मिसळून खावे का?
आयुर्वेदानुसार दह्यात साखर मिसळून खाल्ल्याने मेंदूमध्ये ग्लुकोजचा पुरवठा होतो, ज्यामुळे ऊर्जा वाढते. यासह आपण दिवसभर हायड्रेटेड राहता. दह्यात साखर मिसळून खाणे पोटासाठी चांगले मानले जाते. यामुळे पित्तदोष कमी होतो. शिवाय पचनशक्तीही वाढते. आयुर्वेदानुसार दह्यात आपण साखर, खडीसाखर, तूप, मूग डाळ आणि मध मिक्स करून खाऊ शकता.
तूप करण्यासाठी साय साठवता? पण त्यातून दुर्गंधी येते, बुरशी लागते? ५ टिप्स, साय टिकेल महिनाभर
'या' लोकांनी दह्यात साखर मिसळून खाऊ नये
जे लोकं लठ्ठपणाने त्रस्त आहेत, त्यांनी दह्यात साखर मिसळून खाणे टाळावे. यामुळे वजन झपाट्याने वाढते. यासह ज्यांना ह्रदयाच्या निगडीत समस्या किंवा मधुमेहग्रस्त रूग्णांनी दह्यात साखर मिसळून खाऊ नये.