उन्हाळ्यात नाश्त्यासोबत किंवा जेवणानंतर एक ग्लास ताक प्यायल्यास दिवसभर शरीर निरोगी राहते. ताक हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात खनिजे, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक तत्वांसह चांगले बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ऍसिड देखील आहे. ज्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.पोटाचे आरोग्य राखण्यासोबतच ताक चेहऱ्याचा रंग सुधारण्यासही मदत करते. (side effects of buttermilk) ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक लॅक्टिक अॅसिड चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासही मदत करते. ताकामध्ये अनेक फायदे असूनही काही लोक ताक पिणं टाळतात. कारण काही स्थितीत ताक प्यायल्याने फायद्याऐवजी नुकसान होते. (When should you not drink buttermilk)
१) कोरडी त्वचा
रोज ताक प्यायल्याने त्वचा खूप कोरडी होते. ताकामध्ये अनेक प्रकारचे ऍसिड आणि इतर घटक आढळतात ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होते. एक्जिमा असला तरीही ताक पिणे टाळावे. एक्जिमा हा एक प्रकारचा त्वचेचा संसर्ग आहे ज्यामध्ये तुम्हाला त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे आणि इतर अनेक समस्या उद्भवतात.
२) ताप असेल तर ताक पिणं टाळावं
ताप आल्यास थंड आणि आंबट पदार्थ खाऊ, पिऊ नयेत. तब्येत लवकर बरी होण्यासाठी ताप आल्यास ताक किंवा दही खाऊ नये असा सल्ला नेहमी दिला जातो.
३) सांधेदुखी
ज्या लोकांना सांधेदुखी, स्नायू दुखणे अशा समस्या आहेत त्यांनी ताक पिणं टाळावं. या समस्यांमध्ये जर तुम्ही ताक प्यायले तर तुम्हाला सांध्यांमध्ये जडपणा आणि दुखण्याची समस्या अधिक होऊ शकते.
४) सर्दी, खोकला
जर तुम्हाला सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर ताक सेवन केल्याने तुमची ही समस्या वाढू शकते. आयुर्वेदातही सर्दी-खोकला झाल्यास गरम पदार्थ घेण्याचा सल्ला दिला आहे.
जेवताना कच्चा कांदा आवडीनं खाता? जास्त खाल्ल्यानं होऊ शकतो गंभीर त्रास, हे आहेत साईड इफेक्ट
५) हृदयाचे आजार
ताकामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असल्याने काही गंभीर हृदय रुग्णांमध्ये ते कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करू शकते. ज्या लोकांना आधीच उच्च कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी ताकाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.