Lokmat Sakhi >Food > ज्वारी, बाजरी की नाचणी, कोणती भाकरी कोणी खावी? समजून घ्या भाकरी खाण्याचे फायदे

ज्वारी, बाजरी की नाचणी, कोणती भाकरी कोणी खावी? समजून घ्या भाकरी खाण्याचे फायदे

Is eating Bhakri Good for Health : आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि वातावरणातील बदल लक्षात घेऊन कोणत्या ऋतूत कोणती भाकरी खायची हे ठरवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 06:30 PM2023-02-08T18:30:35+5:302023-02-08T18:48:25+5:30

Is eating Bhakri Good for Health : आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि वातावरणातील बदल लक्षात घेऊन कोणत्या ऋतूत कोणती भाकरी खायची हे ठरवू शकता.

Is eating Bhakri Good for Health : Jowar, Bajra, Ragi which bhakri best fro health | ज्वारी, बाजरी की नाचणी, कोणती भाकरी कोणी खावी? समजून घ्या भाकरी खाण्याचे फायदे

ज्वारी, बाजरी की नाचणी, कोणती भाकरी कोणी खावी? समजून घ्या भाकरी खाण्याचे फायदे

महाराष्ट्रात चपातीसह भाकरीचेही सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. रोजच्या जेवणासाठी चपाती आणि नॉनव्हेज असल्यास भाकरीचा बेत केला जातो. तांदळाची भाकरी सॉफ्ट असते तर नाचणी, ज्वारीची भाकरी कडक होते. बनवण्याच्या पद्धतीनुसार भाकरी मऊ होणारी कडक ते ठरतं. चपातीपेक्षा भाकरी तब्येतीसाठी उत्तम हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. कोणती भाकरी कधी खायची. नाचणी, बाजरीची भाकरी खाल्ल्यानं काय फायदे होतात समजून घेऊया. (Why Bhakri Is Better Than Wheat Roti)
 

ज्वारीची भाकरी ही थंड असते. बाजरी उष्ण असते. नाचणीसुद्धा शीत असते पण अतिप्रमाणात नाही.  चांगल्या ताकदीसाठी नाचणी उत्तम असते. ज्वारी रुक्षता देणारी आहे बाजरीसुद्धा रुक्ष  असते. ज्वारी आणि नाचणी पचायला हलकी असते. बाजरी पचायला थोडी जड असते. (Is eating Bhakri Good for Health)

बाजरीची भाकरी

बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर पोषक असतात. याच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका कमी होतो. आजकाल ते खूप लोकप्रिय आहे कारण ती ग्लूटेन- फ्री आहे आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. बाजरी जटिल कर्बोदकांमध्ये बनलेली असते, जी शरीराद्वारे हळूहळू शोषली जाते. ही भाकरी खाऊन तुम्हाला तृप्त वाटते आणि जास्त खाणं टाळता येतं. बाजरी मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत असल्याने, हृदयाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात बाजरीच्या भाकऱ्यांचा समावेश करणे चांगले आहे.  

मॅग्नेशियम बीपी आणि मधुमेह यांसारख्या हृदयरोगाच्या जोखीम घटकांना प्रतिबंधित करण्यास सक्षम आहे. एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि स्ट्रोकपासून संरक्षण करण्यासाठी मॅग्नेशियमच्या फायदेशीर प्रभावांकडेही अभ्यासांनी लक्ष वेधले आहे. हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. 

ज्वारीची भाकरी

ज्वारी खाल्ल्याने ऊर्जा मिळते. ही ऊर्जा खूप चांगला स्त्रोत आहे. याशिवाय तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही ज्वारी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वास्तविक ज्वारी खाल्ल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.  ज्वारीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय, हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. ज्वारी हे वजन कमी करण्यास मदत करणारे धान्य आहे.  

तुमचे वजन कमी होत असेल तर ज्वारीचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यात ज्वारीचे सेवन करणे अधिक फायदेशीर असते. ज्वारीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. जर तुम्हाला गहू खाण्याची अॅलर्जी असेल तर तुम्ही ज्वारीचे सेवन करू शकता.ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते सहज पचते. ज्वारी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. ज्वारी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

नाचणीची भाकरी

नाचणीच्या भाकरीत अनेक पोषक तत्व असतात. नाजणीची भाकरी पचायला हलकी असते. अॅनिमियाचा त्रास असल्यास अंगातलं रक्त वाढवण्यासाठी नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करा. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना चपाती खाण्याऐवजी  नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तिन्ही प्रकारच्या भाकऱ्या तब्येतीसाठी चांगल्या असतात.

आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि वातावरणातील बदल लक्षात घेऊन कोणत्या ऋतूत कोणती भाकरी खायची हे ठरवू शकता. उन्हाळ्यात ज्वारी, नाचणीची भाकरी तुम्ही खाऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसात या दोन प्रकारच्या भाकऱ्यांबरोबर बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश करा. 

Web Title: Is eating Bhakri Good for Health : Jowar, Bajra, Ragi which bhakri best fro health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.