Lokmat Sakhi >Food > Is Eating Raw Coconut Good For You : केस गळणं थांबवण्यापासून वजन घटवण्यापर्यंत; सुकं खोबरं खाण्याचे 5 फायदे, वाचा आणि आजपासूनच खा!

Is Eating Raw Coconut Good For You : केस गळणं थांबवण्यापासून वजन घटवण्यापर्यंत; सुकं खोबरं खाण्याचे 5 फायदे, वाचा आणि आजपासूनच खा!

Is Eating Raw Coconut Good For You : जर कोरडी त्वचा आणि कुरळे केस तुमचे सौंदर्य कमी करत असतील तर नारळाचे सेवन करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:48 PM2022-04-28T16:48:39+5:302022-04-29T15:10:36+5:30

Is Eating Raw Coconut Good For You : जर कोरडी त्वचा आणि कुरळे केस तुमचे सौंदर्य कमी करत असतील तर नारळाचे सेवन करा.

Is Eating Raw Coconut Good For You : Benefits of coconut here are 5 reasons to eat raw coconut | Is Eating Raw Coconut Good For You : केस गळणं थांबवण्यापासून वजन घटवण्यापर्यंत; सुकं खोबरं खाण्याचे 5 फायदे, वाचा आणि आजपासूनच खा!

Is Eating Raw Coconut Good For You : केस गळणं थांबवण्यापासून वजन घटवण्यापर्यंत; सुकं खोबरं खाण्याचे 5 फायदे, वाचा आणि आजपासूनच खा!

भारतातील  प्रत्येक स्वयंपाक घरात ओलं किंवा सुकं खोबरं असतं.  खोबरं नाही असं एकही घर सापडणार नाही. जेवणाची चव वाढण्यापासून, पदार्थ सजावटीसाठी अनेक कारणांसाठी खोबरं वापरलं जातं. (5 Health and Nutrition Benefits of Coconut)  काहीजण वाटणात खोबरं घालतात तर काहीजण ओलं खोबरं भाजीत वरून घालतात. तुम्हाला कल्पना नसेल पण कच्चं खोबरं खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (Is Eating Raw Coconut Good For You)

दिवसातून सुक्या खोबऱ्याचे एक दोन तुकडे खाल्ले तरी तुम्हाला आरोग्यदायी फायदे मिळतील. कारण ते पोषक तत्वांनी भरलेले आहे. यात तांबे, सेलेनियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. शिवाय, त्यात असलेले फॅट्स खरोखर गुड फॅट्स आहेत. जे तुम्हाला शरीराला चांगले कार्य करण्यास मदत करतील. (Eating Coconut Daily Will Give You These Amazing Health Benefits)
 

१) पोट साफ होण्यास मदत होते

बद्धकोष्ठता हा कमी फायबरयुक्त आहाराचा परिणाम आहे. परंतु, जर तुम्ही सुकं खोबरं खाल्ले तर अशा त्रासाला बळी पडावे लागणार नाही.  नारळात 61%  सर्व फायबर असते त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते आणि आतड्याची हालचाल नियंत्रणात राहतात.

केस खूप कोरडे, खराब झालेत? घरीच पार्लरसारखा Banana Spa करून मिळवा मऊ, मुलायम केस

२) त्वचा आणि केसांचा पोत चांगला राहतो

जर कोरडी त्वचा आणि कुरळे केस तुमचे सौंदर्य कमी करत असतील तर नारळाचे सेवन  करा. नारळातील चरबीचे प्रमाण तुमच्या त्वचेचे पोषण करते, ते हायड्रेटेड आणि लवचिक ठेवते. जेणेकरून कोरडी त्वचा लवकर निघून जाईल.

ग्लोईंग स्किनसाठी कतरिना करते ५ गोष्टी; वयाच्या ३८व्या वर्षीही तरुण दिसण्याचं ब्यूटी सिक्रेट

३) वजन घटवण्यास फायदेशीर

हा एक उत्तम नाश्ता आहे जो त्या भुकेची जाणीव कमी करतो. शिवाय, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे प्रचलित आहे. नारळात असलेले ट्रायग्लिसराइड्स शरीरातील चरबी जाळतात आणि भूक कमी करतात. म्हणूनच, PLOS ONE मध्ये प्रकाशित 2018 चा अभ्यास सांगतो की जेव्हा कमी चरबीयुक्त आहाराचा विचार केला जातो तेव्हा तो एक चांगला पर्याय सुकं खोबरं हा आहे.

४) रोगप्रतिकारकशक्ती वाढते

कोविड-१९ च्या काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यावर सगळ्यांनीच भर दिला. सुखं खोबरं बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विषाणूविरोधी असल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासांपासून वाचवतो. तसेच, जे लोक घसा आणि ब्राँकायटिसच्या समस्येने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हे खरोखर चांगले आहे. 

५) अल्जायमरचा धोका कमी होतो

न्यूट्रिएंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मिडियम चेन ट्रायग्लिसराइड्स नारळातच आढळतात आणि त्यात केटोजेनिक गुणधर्म असतात जे अल्झायमर तसेच इतर  विकारांना प्रतिबंधित करण्यात मदत करू शकतात. मुळात, नारळाच्या चरबीमध्ये उपचारात्मक गुणधर्म असतात जे मानसिक आरोग्य नियंत्रित ठेवतात.

Web Title: Is Eating Raw Coconut Good For You : Benefits of coconut here are 5 reasons to eat raw coconut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.