Lokmat Sakhi >Food > नेहमीची साधी केळीच खावी की वेलची केळी खाणं जास्त फायद्याचं? आहारतज्ज्ञाचं खरंखुरं उत्तर वाचा...

नेहमीची साधी केळीच खावी की वेलची केळी खाणं जास्त फायद्याचं? आहारतज्ज्ञाचं खरंखुरं उत्तर वाचा...

Is Elaichi Banana Better Than Normal Banana : Which is healthiest Small banana vs. Regular banana : Difference Between Banana And Elaichi Banana : केळं खावं पण नेमकं कोणतं ? केळ खाल्ल्याने होतात अनेक फायदे, वाचाल तर रोज खाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 16:21 IST2025-02-26T16:06:56+5:302025-02-26T16:21:36+5:30

Is Elaichi Banana Better Than Normal Banana : Which is healthiest Small banana vs. Regular banana : Difference Between Banana And Elaichi Banana : केळं खावं पण नेमकं कोणतं ? केळ खाल्ल्याने होतात अनेक फायदे, वाचाल तर रोज खाल..

Is Elaichi Banana Better Than Normal Banana Which is healthiest Small banana vs. Regular banana Difference Between Banana And Elaichi Banana | नेहमीची साधी केळीच खावी की वेलची केळी खाणं जास्त फायद्याचं? आहारतज्ज्ञाचं खरंखुरं उत्तर वाचा...

नेहमीची साधी केळीच खावी की वेलची केळी खाणं जास्त फायद्याचं? आहारतज्ज्ञाचं खरंखुरं उत्तर वाचा...

आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात असे अनेक पदार्थ असतात ज्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. आपले आरोग्य आणि तब्येत चांगली ठेवायची असेल तर रोजच्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. भाज्या तर आपल्या रोजच्या आहारात आपण खातोच परंतु विशेष आवर्जून लक्षात ठेवून फळं खाणं (Is Elaichi Banana Better Than Normal Banana) असं होतंच नाही. बहुतेकदा घरात वेगवेगळ्या प्रकारची फळं (Which is healthiest Small banana vs. Regular banana) मोठ्या हौसेने आणली जातात, यात केळी तर आपण न विसरता हमखास आणतोच. परंतु जेव्हा केळं खाण्याची वेळ येते तेव्हा, काहीजण नियमित खातात तर काहींना समोर दिसलं तरी केळी खाण्याची इच्छा होत नाही(Difference Between Banana And Elaichi Banana).

केळ्यांमध्ये आपली नेहमीची केळी आणि वेलची केळी असे दोन मुख्य प्रकारच प्रामुख्याने आपल्याकडे खाल्ले जातात. या दोन्ही प्रकारच्या केळ्यात खरंतर, भरपूर प्रमाणांत पोषणमूल्य असते, परंतु आपल्याकडे नेहेमीच्या केळ्यांपेक्षा ही आकाराने लहान असणारी वेलची केळी खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. अशावेळी नेमका प्रश्न पडतो की, या दोन्ही प्रकारांतील कोणते केळं खाणं आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहे. डाएटिशियन गीतांजली सिंह यांनी onlymyhealth ला दिलेल्या मुलाखतींनुसार नेमकं कोणतं केळं खाणं फायदेशीर आहे ते पाहूयात. 

१. वेलची केळ्यांची खासियत... 

वेलची केळी ही आपल्या नेहमीच्या सामान्य केळ्यांपेक्षा आकाराने थोडी लहान असतात. हे वेलची केळ विशेषतः भारत आणि नेपाळच्या काही भागात फार मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. वेलची केळ्याची साल हलकी पिवळी आणि किंचित हिरवी अशी असते. त्याची चव देखील नेहमीच्या साध्या केळ्यापेक्षा विशेष आणि अधिक गोड असते. अशी ही वेलची केळी अधिक गोड आणि सुगंधी असतात, म्हणूनच सगळ्यांना ती खूप आवडताता. वेलची केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय, त्यात मॅग्नेशियम, लोह आणि जस्त सारखे खनिजे देखील असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.

फळांवर जे स्टिकर्स चिटकवलेलेे असतात, त्यांचा अर्थ काय? तुम्ही नक्की काय पाहून फळं घेणं योग्य, वाचा...

२. नेहमीच्या साध्या केळ्याची खासियत... 

साधी केळी देखील आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. ही केळी सहसा आकाराने मोठी आणि पिवळ्या गडद रंगाची असतात. वेलची केळ्याप्रमाणेच, त्यात पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारची खनिजे देखील असतात. सामान्य केळ्यामध्ये विशेषतः पोटॅशियम भरपूर असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि शरीरातील पाण्याची कमतरता देखील दूर करते. याशिवाय, त्यात असलेले फायबर पचन सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

उन्हाळ्यासाठी खास ताकाचे २ प्रकार, अ‍ॅसिडिटी न होता पचन सुधारेल- पोट राहील तंदुरुस्त...

३. वेलची केळं खाणं अधिक फायदेशीर आहे का ? 

वेलची केळ्याची चव सामान्य केळ्यापेक्षा थोडी वेगळी असते. त्याची चव गोड आणि सुगंधी असते, तर सामान्य केळी फक्त गोड असतात. वेलची केळी आकाराने लहान असले तरीही त्यात पोषक तत्वे, विशेषतः पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर जास्त प्रमाणांत असतात. नेहमीची साधी केळी देखील आरोग्यासाठी फायदेशीरच असतात, परंतु वेलची केळी थोडी अधिक जास्त हेल्दी आणि पौष्टिक असतात. दोन्ही प्रकारची केळी पचनासाठी चांगली असतात, परंतु वेलची केळीमध्ये पचन सुधारणारे घटक जास्त प्रमाणांत असतात. वेलची केळ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. कारण त्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते.

दोन्ही प्रकारची केळी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, वेलची केळी त्याच्या समृद्ध पोषक तत्वांमुळे, चवीमुळे आणि सुगंधामुळे अधिक प्रमाणांत खाल्ली जातात. वेलची केळी शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळवून देण्याचे काम करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. तुमच्या आवडीनुसार आणि शरीराच्या गरजेनुसार तुम्ही तुमच्या आहारात दोन्ही केळींपैकी एकाचा समावेश करू शकता.

Web Title: Is Elaichi Banana Better Than Normal Banana Which is healthiest Small banana vs. Regular banana Difference Between Banana And Elaichi Banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.