कांदे, बटाटे आणि लसून हे तिन्ही पदार्थ अनेक जणी एकत्रच ठेवतात. ज्या खूप जास्त लसूण घेतात, त्या लसूण वेगळा बांधून ठेवतात. पण कांदे आणि बटाटे मात्र बहुसंख्य घरांमध्ये एकत्रच ठेवलेले दिसतात (Is it good to store pyaaz and aloo together?). बऱ्याचदा तर फ्रिजच्या सगळ्यात खालच्या ट्रॉलीमध्ये कांदे- बटाटे एकत्र करून ठेवले जातात. पण असं करणं कितपत योग्य आहे? ( How to store onion and potato for long?) खरंच अशा पद्धतीने कांदे- बटाटे साठवून ठेवावे का? याविषयीची माहिती आता पाहूया.. (Proper method for the storage of onion and potato)
कांदे- बटाटे एकत्र साठवून ठेवावे का?
कांदे आणि बटाटे एकाच टोपल्यात साठवून ठेवणं खरंच कितपत योग्य आहे, याविषयीची माहिती 40plus_mom या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
ऑफिससाठी केलेला मेकअप 'ओव्हर' होऊ नये म्हणून ३ गोष्टी लक्षात ठेवा, मिळेल नॅचरल लूक
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की कांद्यातून इथलिन हा वायू निर्माण होत असतो. जर कांदे आणि बटाटे एकत्र असतील तर इथलिन या वायुमुळे बटाट्यांना कोंब फुटण्याची प्रक्रिया अधिक जलद होते.
थंड झालेला भात मायक्रोवेव्ह न वापरता गरम करण्याची सोपी ट्रिक- १ मिनिटात गरमागरम वाफाळता भात तयार..
त्याचबरोबर जेव्हा बटाट्यांना कोंब फुटायला लागतात, तेव्हा ते अधिक ओलसर होत जातात. बटाट्यांच्या ओलसरपणामुळे मग कांदेही लवकर खराब होतात, सडू लागतात. अशा पद्धतीचे कांदे आणि बटाटे खाणं आपल्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. त्यामुळे कांदे आणि बटाटे नेहमीच वेगवेगळे साठवून ठेवावे.
कांदे- बटाटे साठवून ठेवण्याची योग्य पद्धत
बटाटे अधिक काळ टिकवायचे असतील तर ते थंड, अंधाऱ्या जागी साठवून ठेवावे.
स्वयंपाक करायचाय पण कोथिंबीर, आलं, कढीपत्ता नाही? बघा १ सिक्रेट उपाय, स्वयंपाकाला येईल न्यारीच चव...
कांदे नेहमीच स्वच्छ सुर्यप्रकाश जिथे येईल, अशा जागी साठवून ठेवावे. कांदे साठवून ठेवण्यासाठी नेहमी दुरडी किंवा जाळीदार टोपल्याचा वापर करावा.
कांदे आणि लसूण एकत्र साठवून ठेवू शकता. पण बटाट्यांसोबत लसूणही कधीच ठेवू नये.