Join us  

कलिंगड खाल्ल्यावर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञ सांगतात, पोट बिघडण्याची शक्यता कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 5:41 PM

Should You Drink Water After Eating Watermelon? Expert Answers : उन्हाळ्यात सर्रास कलिंगड खाल्ले जाते, पण पचन ते खाऊनही बिघडू शकतेच कारण..

उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार, लालचुटुक, रवाळ कलिंगड खाणे म्हणजे सुखद आनंद असतो. उन्हाळ्यात वाढत्या उन्हामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची फळ, ज्यूस, सरबत पिण्याला प्राधान्य देतो. कलिंगड आणि टरबूज अशी रसाळ फळ उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जातात. कलिंगड आणि टरबूज चवीला चांगले असण्यासोबतच आरोग्यदायी देखील असतात. या दोन्ही फळांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. या दोघांचे सेवन केल्याने शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो.

 कलिंगड खाल्ल्याने शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो. तसेच, त्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. उष्णतेची लाट टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला सतत हायड्रेट ठेवणे. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अधिकाधिक पाणी आणि अशी रसाळ फळे खाणे आवश्यक असते. कलिंगड हे उन्हाळ्यात येणारे सगळ्यांच्याच आवडीचे फळ असते. परंतु कलिंगड खाण्याच्या सवयी बाबतीत आपल्याकडे अनेक समज - गैरसमज आहेत. कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये असा अनेकांचा समज आहे कारण आरोग्यानुसार असे करणे योग्य नाही, असे मानले जाते. कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने खरोखरच तब्येत बिघडते की पोटात काही समस्या निर्माण होता याबाबतीत तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेऊया(Is it harmful to drink water after eating watermelon or is it a myth?).

कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की पिऊ नये ? बघा तज्ज्ञ नेमकं काय सांगतात... 

ओन्ली माय हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, टरबूजमध्ये ९२ % पाणी असते, जे हायड्रेट आणि तुमची तहान शमवण्यासाठी पुरेसे असते. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे ए आणि सी असतात. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा निरोगी राहते. याशिवाय, हे कमी कॅलरी आणि उच्च फायबर समृद्ध फळ आहे. पण टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अस्वस्थता आली आहे का?

आंबा खाल्ल्यावर लगेच खाऊ नयेत असे ५ पदार्थ, बिघडेल पोट-सांभाळा...

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होतो आणि पचन प्रक्रियेत अडथळा येतो. मात्र, अनेक रिपोर्ट्समध्ये या गोष्टीचे खंडन करण्यात आले असून असे काहीही होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही.डॉक्टरांच्या मते, कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिणे सामान्यतः सुरक्षित असते आणि त्याचे कोणतेही विशेष दुष्परिणाम होत नाहीत. मात्र, कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की पिऊ नये हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. 

आंब्याच्या फोडी कापून ठेवल्यानंतर लगेच काळ्या पडतात ? ४ सोप्या ट्रिक्स, आंब्याचा अस्सल केशरी रंग टिकून राहील...

कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याबाबत कोणताही नियम नाही... 

कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याचा कोणताही विशिष्ट असा नियम नाही. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा तुम्ही कलिंगड खाल्ल्यानंतर आरामात पाणी पिऊ शकता. उन्हाळ्यात दिवसभर हायड्रेट राहणे सर्वात महत्त्वाचे असते. आपले शरीर सुमारे ६० % पाण्याने बनलेले आहे आणि अनेक शारीरिक कार्यांमध्ये पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच, हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शारीरिक असमतोल होऊ शकतो. कलिंगड शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करते. 

 

टॅग्स :अन्न