Roti aur chawal khane ke fayde : भारतीय आहारात चपाती आणि भात असतोच असतो. दोन्ही गोष्टी एकत्र खाण्याची एक कॉमन सवय आहे. पण चपाती आणि भात एकत्र खाणं योग्य की अयोग्य? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. मुळात तुमची शारीरिक स्थिती आणि पोषणाच्या गरजा काय आहेत यावर ही गोष्टी अवलंबून असते. अशात हे जाणून घेऊ चपाती आणि भात एकत्र खाण्याचे फायदे आणि काही नुकसान.
चपाती-भात एकत्र खाण्याचे फायदे
एनर्जी मिळते
चपाती आणि भात दोन्हींमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. असात चपाती आणि भातामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. ज्यामुळे तुम्ही दिवसभर अॅक्टिव राहता.
पोषक तत्व
चपातीमध्ये फायबर भरपूर असतं आणि भातात कार्बोहायड्रेट्स असतात. अशात शरीराला दोन्ही प्रकारचे पोषक तत्व मिळतात. फायबरुमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि बद्धकोष्ठतेची समस्याही होत नाही.
खाण्याची कायम राहते
चपाती आणि भात दोन्ही सोबत खाणं आनंद देणारं असते. त्यामुळे या गोष्टी एकत्र खाल्ल्या तर तुमची खाण्याची इच्छा कायम राहते.
चपाती आणि भात एकत्र खाण्याचे नुकसान
चपाती आणि भात दोन्हीमध्येही कार्बोहायड्रेट्स असतात. एक्सपर्ट्सनुसार, भात-चपाती एकत्र का खाऊ नये. कारण याचा थेट संबंध कॅलरी काऊंटशी जोडला जातो. जेव्हा भात आणि चपाती एकत्र खाण्यात येते तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी इनटेक करत असता आणि जास्त कॅलरी असलेला आहार घेतल्यावर पचन तंत्रांवर अधिक दबाव पडतो. सोबतच वजनही वाढतं..
पचनशक्ती कमजोर
भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमजोर होते. तसेच शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि यामुळे लठ्ठपणाची समस्या होते. काही रिसर्चमधूनही समोर आली आहे की, भात आणि चपाती जेव्हाही खायची असेल तर दोन्हीपैकी एकच गोष्ट खावी.
रात्री काय खावं?
डाएट एक्सपर्ट्सही हेच सांगतात की, भाताच्या तुलनेत चपाती पचायला हलकी आहे. जर तुम्ही रात्री चपाती खात असाल तर ती सहज पचते. पण जर रात्री तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला चांगली झोप येणार नाही. चांगली झोप न झाल्यानं पचनक्रिया विस्कळीत होते, यामुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो.