ॲल्युमिनियमची भांडी पूर्वी भरपूर वापरली जात. अजूनही अनेक घरात या भांड्यात स्वयंपाक केला जातो. कारण ही भांडी अन्य भांड्यांपेक्षा स्वस्त असतात. ॲल्युमिनिअम आणि हिंडालीयम या धातूंची भांडी घरोघर वापरली जात, अनेक वर्षे वापरली कुठे काय अपाय झाला असा एक प्रश्नही विचारला जातोच. पण खरंच ॲल्युमिनियमची भांडी वापरणं आरोग्यासाठी अपायकारक असतं की नसतं?
(Image :google)
अल्युमिनियमची भांडी वापरणं किती सुरक्षित आहे?
१. ॲल्युमिनियमच्या भांड्यांत पदार्थ शिजवला आणि त्यातच बराच वेळ ठेवला तर त्या पदार्थात ॲॅल्युमिनियम उतरण्याची शक्यता असते.२. बेकिंग ट्रे, फॉईल्स या स्वरुपातही ॲल्युमिनियम वापरलं जातं. फॉईल वापरुन बाहेर ऑर्डर केलेले पदार्थही हॉटेलमधून घरी येतात. काहीजण ऑफिसलाही डबा नेण्याऐवजी पोळ्या, पराठे, सँडविच गुंडाळून नेतात. हे पदार्थ गरम असताना फॉइलमध्ये गुंडाळणे योग्य नाही.३. आंबट आणि मॅरिनेट केलेले पदार्थही फॉइलमध्ये ठेवू नयेत.
४. क्वचित ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवले तर काही बिघडत नाही. मात्र नेहमी वापरले तर ते मेंदूसाठी बरे नाही. विसराळूपणा वाढतो. मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.त्यामुळे शक्य असेल तेव्हा ॲल्युमिनिअमची भांडी न वापरणंच योग्य आहे.
(Image :google)
मग प्लास्टिक चालेल का?
अन्न शिजवणं, काढून ठेवणं किंवा खाणं या कोणत्याही कामासाठी प्लॅस्टिक वापरणं योग्य नाही.केवळ कोरडे धान्यं, कडधान्यं साठवण्यासाठी योग्य आहे. पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्याही वापरु नयेत. गरम जेवण प्लास्टिकच्या डब्यात भरुन नेऊ नये.त्यापेक्षा स्टिलचे डबे वापरणे उत्तम. केवळ सांडलवंड होत नाही म्हणून प्लास्टिक वापरणे काही आरोग्यासाठी योग्य नाही. आपण चुकीची भांडी आणि डबे वापरुन आजारांना आमंत्रण देत नाही ना हे बघायला हवे.
काळजी घेणं आपल्या हातात आहे. छोटे लाइफस्टाइल बदल आपल्याला मोठ्या आजारपणापासून दूर ठेवू शकतात. विशेषत: मुलं वयात येत असताना, हार्मोनल बदल होत असताना तर खाण्यापिण्यासह व्यायाम, आहारविहार, भांडी वापर यांची पुरेशी काळजी घ्यायला हवी. योग्य शास्त्रीय माहितीच्या आधाराने आपला आहारविहार ठेवला तर जास्त चांगले.