Join us

सकाळी वेळ नाही म्हणून रात्रीच पीठ मळून ठेवता? फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या खाणं योग्य की अयोग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2023 11:45 IST

Is overnight dough good : रात्री पीठ मळून ठेवलं आणि सकाळी चपात्या केल्या तर आरोग्याला अपाय होतो का?

सध्या प्रत्येक जण बिझी शेड्युलमध्ये व्यस्त आहेत. ज्यामुळे अनेक जण सकाळचा नाश्ता असो किंवा टिफिनची तयारी रात्रीच करून ठेवतात. बऱ्याच गृहिणी रात्रीच्या वेळेस कणिक मळून ठेवतात. जेणेकरून सकाळच्या घाई-गडबडीत चपात्या झटपट तयार होतात. शिळी चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण शिळ्या कणकेच्या चपात्यांचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो का

अनकेदा रात्री फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवलेली कणिक काळपट पडते, ती कणिक काळपट का पडते? याचा विचार आपण कधी केला आहात का? कणिक अधिक वेळ स्टोर करून ठेवल्याने त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जात नाही. स्टोर करून ठेवलेल्या कणकेच्या चपात्या खाण्याचे दुष्परिणाम किती पाहूयात(Is overnight dough good?).

तळलेल्या जाड पोह्यांचा करा कुरकुरीत खमंग चिवडा, चटकदार चिवडा-टिकेल महिनाभर फ्रेश

- कणिक मळल्यानंतर त्यात फरमेण्टेशनची प्रक्रिया सुरू होते. ज्यामुळे त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. बरेच लोकं रात्रीच्या वेळेस कणिक मळून ठेवतात. ज्यामुळे त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. हे बॅक्टेरिया आपल्या आरोग्यासाठी घातक मानले जाते. दररोज जर आपण शिळ्या कणकेच्या चपात्या तयार करून खात असाल तर, आरोग्य बिघडू शकते.

कपभर पोह्याची करा इन्स्टंट कुरकुरीत चकली, ना भाजणी करायची गरज ना उकड घेण्याची..बघा रेसिपी

- शिळ्या कणकेच्या चपात्या खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यांनी शिळ्या कणकेच्या चपात्या खाऊ नये. यामुळे पचन तर बिघडतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते.

- असे म्हटले जाते की १२ तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले शिळे अन्न खाल्ल्याने डायरिया, फूड पॉयझनिंग, अॅसिडिटी आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. शिवाय शिळे अन्न गरम करून खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स