Join us  

तुम्ही खाताय ते च्यवनप्राश अस्सल आहे की बनावट ? कसे ओळखाल, २ टिप्स करतील मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 1:11 PM

How to Identify Real Chyawanprash हिवाळ्यात बहुतेक लोकं घरी च्यवनप्राश खातात. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आपण खात असलेला च्यवनप्राश खरा आहे की खोटा हे कसे ओळखाल ?

हिवाळा सुरु झाला की अनेक घरात च्यवनप्राश खाण्यास सुरुवात होते. च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आजारांशी दोन हात करायला ताकद मिळते. यासह दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. कारण हिवाळ्यात सर्दी - खोकल्याची समस्या ही चालूच राहते. थंडीच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. यासाठी आपण च्यवनप्राशचं सेवन अधिक प्रमाणावर करतो. मात्र, आपल्या घरात जे च्यवनप्राश आहे ते च्यवनप्राश भेसळयुक्त तर नाही ना ? आपल्या घरातील च्यवनप्राश अस्सल आहे की बनावट याची पडताळणी करायची असेल तर, काही टिप्स फॉलो करा. च्यवनप्राश खरेदी करताना रियल प्रोडक्टला ओळखा.

असे ओळखा अस्सल च्यवनप्राशला 

च्यवनप्राश हे ५० हून अधिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केले जाते. ज्यामध्ये आवळा, पिंपळी, तूप, तमालपत्र, जायफळ, सुंठ, दालचिनी, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, बडीशेप, जिरे आणि केशर या सगळ्या गोष्टी ग्राउंड करून वापरल्या जातात. नंतर त्यात गूळ मिसळला जातो. गुळ जरी मिसळले असले तरी देखील चवीला ते गोड लागत नाही. सौम्य गोडपणा आणि थोडा कडूपणा त्यात जाणवेल.

च्यवनप्राश असली आहे या नकली हे ओळखण्यासाठी त्याची चव चाखा. जर च्यवनप्राश साखरेसारखे चवीला गोड लागत असेल, तर त्यात साखर मिसळली असावी. त्यामुळे च्यवनप्राशला खरेदी करताना त्याची चव चाखुनच खरेदी करावी.

च्यवनप्राश हे देशी तूप आणि गुळापासून बनवली जाते. देशी तूप आणि गुळ हे दुधात अथवा पाण्यात विरघळत नाही ते दुधावर तरंगतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरातील च्यवनप्राश पाण्यात किंवा दुधात विरघळले तर ते बनावट आहे.

च्यवनप्राश खाण्याचे फायदे

छातीत उबदार वाटणे

हिवाळ्यात च्यवनप्राश खाल्ल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. नियमित च्यवनप्राश खाल्ल्याने सर्दी होणार नाही, याची खास गोष्ट म्हणजे च्यवनप्राशच्या वनौषधींमध्ये इतकी उष्णता असते की तुम्हाला शरीरात नेहमी उष्णता जाणवेल.

सर्दी होणार नाही

ज्या लोकांना वारंवार सर्दी आणि फ्लू होतो त्यांनी च्यवनप्राश नियमित खायला हवा . याने शरीर आतून उबदार राहते. तसेच कफ आणि खोकला प्रतिबंधित करते.

हिवाळ्याच्या संसर्गापासून संरक्षण करते

जर तुम्हाला हिवाळ्यात संसर्ग टाळायचा असेल तर, तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारशक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. अशा परिस्थितीत च्यवनप्राश एक असा स्रोत आहे, जो तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. याने आपल्याला इन्फेक्शनचा त्रास होणार नाही.  

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न