Lokmat Sakhi >Food > इडली करताना झाकणातल्या वाफेचं पाणी पडून ती ओली होते? १ सोपा उपाय... इडली बनेल परफेक्ट..

इडली करताना झाकणातल्या वाफेचं पाणी पडून ती ओली होते? १ सोपा उपाय... इडली बनेल परफेक्ट..

Is The Idli Wet Due To Steam Dripping From The Lid :1 Easy Solution : इडली बनवताना ती वाफेमुळे भिजून ओली होत असेल तर नेमका काय उपाय करता येऊ शकतो, पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 02:49 PM2023-01-18T14:49:54+5:302023-01-18T14:54:22+5:30

Is The Idli Wet Due To Steam Dripping From The Lid :1 Easy Solution : इडली बनवताना ती वाफेमुळे भिजून ओली होत असेल तर नेमका काय उपाय करता येऊ शकतो, पाहा

Is the idli wet due to steam dripping from the lid? 1 easy solution... Idli will be perfect... | इडली करताना झाकणातल्या वाफेचं पाणी पडून ती ओली होते? १ सोपा उपाय... इडली बनेल परफेक्ट..

इडली करताना झाकणातल्या वाफेचं पाणी पडून ती ओली होते? १ सोपा उपाय... इडली बनेल परफेक्ट..

आपल्याकडे नाश्त्याला बऱ्याचदा इडली, डोसा, मेदू वडा, उत्तपा असे साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खाल्ले जातात. कधी आपण हे पदार्थ कुठल्या उडप्याकडून आणतो तर कधी घरीच बनवून खातो. इडली दिसायला पांढऱ्या शुभ्र रंगाची खाण्यासाठी मऊ आणि पचण्यासाठी हलकी असते. उडीद डाळ, तांदूळ भिजवून, बारीक वाटून, आंबवून इडली बनविली जाते. इडली नारळाची चटणी किंवा सांबर यांसोबत सर्व्ह केली जाते. आरोग्यासाठी इडली उत्तम आहार आहे. इडली हा एक असा एक पदार्थ आहे जो तुम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण अथवा संध्याकाळी आणि रात्रीदेखील खाऊ शकता. त्यामुळे आजकाल घरोघरी या साऊथ इंडियन पदार्थांची लोकप्रियता वाढतच जात आहे.आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात इडली बनविण्याचे इडली पात्र असते. या इडली पात्राचा उपयोग करून अगदी सहजरीत्या आपण चटकन घरी इडल्या बनवू शकतो. परंतु इडली पात्राचा इडली बनवताना नेमका कसा उपयोग करावा किंवा इडली बनवताना ती वाफेमुळे भिजून ओली होत असेल तर नेमक काय उपाय करता येऊ शकतात ते समजून घेऊयात(Is The Idli Wet Due To Steam Dripping From The Lid :1 Easy Solution).

 नक्की काय करता येऊ शकत? 

इडली बनवताना त्याला गरम पाण्याची वाफ लागून इडली भिजून पचपचीत होत असेल तर चिंता करू नका त्यावर एक सोपा उपाय आहे तो समजून घेऊयात.

saritaskitchenofficial या इंस्टाग्राम पेजवरून इडली बनवताना ती वाफेमुळे भिजून ओली होत असेल तर नेमक काय उपाय करता येऊ शकतो. याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

वाफेच्या पाण्याने इडली ओली होते?

आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे अ‍ॅल्युमिनियम किंवा स्टीलचे इडली पात्र असेल. इडली पात्र कुठल्याही धातूचे किंवा कितीही स्टायलिश असो त्या इडली पात्राच्या प्रत्येक गोलाकार ट्रे ला एका विशिष्ट्य ठिकाणी ३ होल्स दिलेलं असतात. इडली करताना आपण या इडली पात्राच्या प्रत्येक ट्रे मध्ये इडलीचे बॅटर भरतो. इडलीचे हे बॅटर भरल्यानंतर आपण हे ट्रे एका उभ्या स्टँडच्या मदतीने एकमेकांवर रचून ठेवतो. हे ट्रे एकमेकांवर रचून ठेवताना ते कसेही रचून न ठेवता एका खास विशिष्ट्य पद्धतीने रचून घ्यावेत. ज्यावेळी आपण इडलीचे बॅटर इडली ट्रे मध्ये ओततो, आणि इडली वाफवायला ठेवतो त्यावेळी तो साचा किंवा पात्र असे सेट करावे की, ते ३ होल्स आहेत ते खालच्या इडलीच्या वर आले पाहिजेत. यामुळे जी काही वाफ तयार होते ती वाफ त्या होलांमधून वर निघून जाते त्यामुळे त्या जागी वाफ साचून पाणी रहात नाही. पर्यायी, वाफेमुळे इडली भिजून मऊ किंवा पचपचीत होत नाही.

Web Title: Is the idli wet due to steam dripping from the lid? 1 easy solution... Idli will be perfect...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.