Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...

हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...

Trick To Extract Makhan From Malai : How To Make Ghee At Home : Is There Any Problem In Extracting Ghee From Cream In Winter Than Try These Remedies : ऐन थंडीच्या दिवसांत जर साठवलेली साय वापरुन तूप करत असाल, तर लक्षात ठेवा एक सोपी युक्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2024 04:00 PM2024-11-20T16:00:21+5:302024-11-20T16:01:00+5:30

Trick To Extract Makhan From Malai : How To Make Ghee At Home : Is There Any Problem In Extracting Ghee From Cream In Winter Than Try These Remedies : ऐन थंडीच्या दिवसांत जर साठवलेली साय वापरुन तूप करत असाल, तर लक्षात ठेवा एक सोपी युक्ती...

Is There Any Problem In Extracting Ghee From Cream In Winter Than Try These Remedies Trick To Extract Makhan From Malai How To Make Ghee At Home | हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...

हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...

आपल्यापैकी काही घरांमध्ये अजूनही घरगुती पद्धतीने साजूक तूप तयार केले जाते. याउलट काहीजण तूप तयार करण्याचे काम फारच वेळखाऊ व किचकट असल्याने बाहेरुन विकत आणतात. बाजारातून विकत आणलेल्या तुपाला घरच्या सारखी चव नसते. यासाठीच बऱ्याच घरांमध्ये दुधावर येणारी जाड साय रोज वेगळी काढून साठवली जाते. ही साय साठवून त्यापासून घरच्या घरी तूप बनवले जाते. घरी तूप तयार करण्याची योग्य पद्धत सर्वांनाच माहित असते असे नाही. अशावेळी तूप बनवताना काही चुका झाल्या तर तूप व्यवस्थित बनत नाही किंवा खराब होते. तूप तयार करण्यासाठी दुधाच्या सायीचा वापर केला जातो. ही साय भरपूर प्रमाणांत साठवली जाते. हिवाळ्याच्या दिवसांत काहीवेळा ही साय बाहेरच्या थंड वातावरणामुळे पातळ होते तर कधी साय कमी प्रमाणात असते.  अशावेळी तूप नेमके कसे तयार करावे असा प्रश्न पडतो(How To Make Ghee At Home).

दूधाच्या सायीपासून घरीच तूप बनवल्यास तुम्हाला अस्सल चवीचं साजूक तूप चाखायला (Trick To Extract Makhan From Malai During Winter Season) मिळू शकतं. घरी तूप बनवायला खूप वेळ लागतो, तर कधी पुरेसं तूप निघत नाही म्हणून आपण कंटाळून घरी तूप बनवणं टाळतो. थंडीच्या दिवसांत काहीवेळा साठवलेली साय थंडीने गोठते किंवा काहीवेळा हवं तसं योग्य पद्धतीचे  सुवासिक,रवाळ, दाणेदार तूप निघत नाही. यासाठी हिवाळ्यात जर साठवलेली साय वापरुन तूप करत असाल तर काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा. तूप बनवण्याआधी काही ट्रिक्स वापरल्या आणि तूप बनवण्याची योग्य पद्धत माहित करून घेतली तर जास्त मेहनत न घेता भरपूर तूप घरीच बनवता येऊ शकतं(Is There Any Problem In Extracting Ghee From Cream In Winter Than Try These Remedies).

ट्रिक १ :- साठवलेल्या सायीत गरम पाणी मिक्स करा. 

शक्यतो हिवाळ्यात फ्रिजमध्ये साठवून ठेवलेली साय थंड वातावरणामुळे गोठते. यामुळे अशा गोठलेल्या सायीचे तूप तयार करणे म्हणजे फारच अवघड काम असते. अशी गोठलेली साय वापरुन तूप तयार केले तर ते व्यवस्थित होत नाही किंवा त्याला पाहिजे तसा सुवास, रवाळ, दाणेदारपणा येत नाही. अशावेळी या गोठलेल्या सायीपासून तूप तयार करताना गरम पाण्याचा वापर करावा. तूप तयार करताना गरम पाण्याच्या वापर केल्यास लोणी आणि ताक वेगळे होण्यास अधिक मदत होते, आणि तूप न बिघडता अगदी व्यवस्थित तयार होते. 

डाळ-तांदूळ न वाटता; १५ मिनिटांत करा तांदळाच्या पिठाचा डोसा; सोपी रेसिपी-चवीला भारी...

ट्रिक २ :- तूप तयार करताना दह्याचा असा करा वापर.    

हिवाळ्याच्या दिवसात तूप तयार करताना बाहेरच्या थंड वातावरणामुळे तूप पटकन तयार होत नाही. यासाठी साठवलेली साय फेटून घेताना त्यात चमचाभर दही  घाला. या ट्रिकमुळे सायीपासून अगदी झटपट तूप तयार करता येऊ शकते. याचबरोबर, तुपासाठी साठवलेली साय फ्रिजमधून बाहेर काढून २ तास तशीच ठेवावी, साय रुम टेम्परेचरला येऊ द्यावी, त्यांनंतरच त्यापासून तूप तयार करावे. 

साजूक तुपाला वास लागू नये म्हणून ७ टिप्स, तूप महिनोंमहिने राहील सुगंधी आणि रवाळ...

ट्रिक ३ :- साठवलेल्या सायीपासून असे करा तूप. 

 एका स्टिलच्या डब्यात आठवडाभर दुधाची साय जमवून ठेवा. ही साय रेफ्रिजरेटरमध्ये व्यवस्थित स्टोअर करुन ठेवावी. जेव्हा भरपूर साय जमा होईल तेव्हा ती रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढून ठेवा. ही साय सामान्य तापमानाला येण्यासाठी १ तास अशीच बाहेर ठेवा. अशा प्रकारे ही साठवलेली साय मऊ होईल. पॅनमध्ये ही साय ओतून घ्यावी. चमच्याच्या मदतीने ही साय पॅनमध्ये हलवून घ्यावी. जर या सायीमध्ये गुठळ्या झाल्या असतील तर चमच्याने हलकेच या गुठळ्या मोडून घ्याव्यात. त्यानंतर गॅस बंद करुन हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यावे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात थोडे दही घालून त्या सायीमध्ये मिक्स करावे. आता हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी जर आपण हे मिश्रण उघडून पहिले तर आपल्याला यात जाडसर सायीचा थर आलेला दिसेल. आता या मिश्रणात बर्फाचे खडे घालून हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे. २ ते ३ मिनिटे फेटून घेतल्यानंतर त्यातून लोणी बाहेर पडेल. हे तयार झालेले लोणी एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावे. आता गॅसच्या मंद आचेवर भांड ठेवून त्यात लोणी घालून चिमूटभर हळद घालावी, आणि शिजवून घ्यावे.  

तुपासाठी साय साठवताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, साय खराब होणार नाही, तूपही निघेल भरपूर...

 

Web Title: Is There Any Problem In Extracting Ghee From Cream In Winter Than Try These Remedies Trick To Extract Makhan From Malai How To Make Ghee At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.