Join us  

शुद्ध तूप म्हणून विकत आणलेल्या तुपातली भेसळ कशी ओळखाल? ४ सोप्या पद्धती, कळेल चटकन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 2:34 PM

How can you test the purity of ghee easily at home? : आपल्या घरी आणलेल्या तुपात भेसळ तर नाही हे एकदा तपासून पाहा...

पदार्थांची चव व स्वाद वाढवण्यासाठी आपण रोजच्या जेवणात नेहमी तुपाचा वापर करतो. वरण भात, पुरणपोळी, मोदक, खिचडी या पदार्थांची तूपाशिवाय आपण अजिबातच कल्पना करू शकत नाही. आजकाल बाजारांत वेगवेगळ्या ब्रॅंड्सचे तूप अगदी सहज विकत मिळते. परंतु घरच्या घरी बनवलेले अस्सल तूप म्हणजेच आपण जे घरी गाय किंवा म्हशीचे दूध तापवून लोणी कढवून तयार करतो ते तूप, हेच तूप अस्सल तूप म्हणून ओळखले जाते. सध्या बाजारांत कितीही चांगल्या दर्जाचे तूप विकत मिळत असले तरीही त्यात कमी अधिक प्रमाणात भेसळ ही असतेच. 

आयुर्वेदानुसार तुपाच्या सेवनामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त तुपामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होतं आणि आरोग्याला पोषण तत्त्वांचाही पुरवठा होतो. पूर्वीच्या काळी बहुतांश लोक घरामध्येच तूप तयार करत असतं. आता धकाधकीच्या आयुष्यामुळे घरामधील बऱ्याच सर्व गोष्टी बाजारातूनच खरेदी करून आणल्या जातात. पण तूप खरेदी करताना ते शुद्ध आहे की भेसळयुक्त? ही शंका वारंवार मनामध्ये येते. भेसळयुक्त तूप खरेदी केल्याने पैशांसह आरोग्याचंही नुकसान होतं. बाजारात उपलब्ध असणारे तूप १०० % शुद्ध असते, असा दावा केला जातो. परंतु खरंतर यामध्ये अनेक प्रकारे भेसळ केलेली असते. भेसळयुक्त तुपाचा वापर केल्यास कित्येक आजारांची लागण होण्याची भीती असते. आपल्या घरी येणारे तूप हे भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही खास टिप्स(Is Your Ghee Adulterated? 4 Simple Tests To Find Out).

या गोष्टी मिसळून बनावट तूप तयार केले जाते... 

तुपाची भेसळ करण्यासाठी वनस्पती तेल, वितळलेले लोणी, डालडा आणि हायड्रोजनेटेड तेल यासारख्या स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या तेलांचा वापर केला जातो. याशिवाय मॅश केलेले बटाटे आणि रताळेही त्यात घालून भेसळयुक्त तूप तयार केले जाते. 

आपण रोज खातो त्या १० पदार्थांमधील भेसळ चटकन ओळखा... 

खमंग खुसखुशीत ‘सोयाबिन थालीपीठ’ खाऊन तर पाहा, वजन कमी करण्यासाठीही पौष्टिक नाश्ता...

भेसळ ओळखण्यासाठी नेमकं काय करावे ? 

१. एका भांड्यामध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. जर तूप लगेचच वितळलं आणि त्यास गडद तपकिरी रंग आला तर हे तूप शुद्ध आहे. तसंच जर तूप वितळण्यास वेळ लागत असल्यास आणि त्यास हलका पिवळा रंग आल्यास तूप भेसळयुक्त आहे, हे लक्षात घ्यावे.

२. घरच्या तुपामध्ये भेसळ आहे की नाही हे ओळखण्यासाठी सर्वप्रथम ग्लासभर पाणी घ्यावे. त्यानंतर एक चमचा तूप घेऊन या पाण्याने भरलेल्या ग्लासात ओतावे. जर तूप पाण्यात तरंगू लागले तर ते शुद्ध आहे. याउलट तूप पाण्याखाली बुडले तर त्यात भेसळ आहे, असे समजावे.

 ३. तूप शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी ते उकळून तपासून पाहू शकता. यासाठी एका भांड्यात ३ ते ४ चमचे तूप उकळवा आणि त्याच भांड्यात ते तूप २४ तास थंड होण्यासाठी ठेवा. २४ तासांनंतर जर तुपाचा रंग अजूनही पिवळा असेल, तूप पूर्णपणे जमले नसल्यास, आणि वास पूर्वीसारखाच राहिला असेल, तर ते शुद्ध तूप आहे.

दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत...

४. आपल्या हातावर एक चमचा तूप घ्या आणि थोड्या वेळाने ते आपोआप विरघळू लागल्यास ते तूप शुद्ध आहे, असे समजावे. तसेच तूप हातावर रगडल्यानंतरही घट्ट होत असेल आणि त्यास कोणत्याही प्रकारचा सुगंध येत नसेल तर तूप भेसळयुक्त आहे, असे समजावे. 

५. देशी तुपात नारळाचे तेल अनेकदा मिसळून भेसळ केली जाते. या प्रकरणात भेसळ तपासण्यासाठी, काचेच्या भांड्यात थोडं तूप घ्यावे आणि डबल बॉयलर प्रक्रिया वापरून ते वितळवा. आता हे मिश्रण एका बरणीत ओतावे आणि काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. थोड्या वेळाने तूप वेगवेगळ्या थरांत घट्ट झालेले दिसले तर तुपात भेसळ आहे, असे समजावे.

टॅग्स :अन्न