Join us  

जांभळाचा सिझन आहे, मनसोक्त जांभळं खा, पण त्यासोबत 4 गोष्टी खाणं धोक्याचं, पाहा लिस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 9:03 AM

विरुद्ध गुणधर्म असलेले दोन पदार्थ एकत्र खाल्ले की पोटाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते, पाहूया जांभळासोबत कोणते पदार्थ टाळायला हवेत...

ठळक मुद्देpजांभूळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी त्यासोबत काय खाऊ नये हे समजून घेणे महत्त्वाचे आहेविरुद्ध आहार पोटासाठी घातक असतो, त्यामुळे आहारशास्त्राचे काही नियम माहित असायलाच हवेत

पावसाळ्यात बाजारात मिळणारे जांभूळ आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. डायबिटीससारख्या समस्यांवरही जांभूळ खाणे फायदेशीर ठरते. त्या त्या सिझनमध्ये बाजारात येणारी फळे आवर्जून खायला हवीत असं म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी आपण ती खातोही. जांभळामध्ये हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात असल्याने ज्या महिलांना अॅनिमियाचा त्रास असतो अशांनी आवर्जून जांभूळ खायला हवे. जांभळामुळे हृदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी, पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी तसेच त्वचेसाठी जांभूळ खाणे फायद्याचे असते. पण ही फळं चुकीच्या पद्धतीने खाल्ली गेल्यास त्याचा शरीराला फायदा होण्याऐवजी त्रास होतो. जांभूळ हे फळ चवीला काहीसे गोड तर काहीसे तुरट असते. या फळासोबत विरुद्ध चवीच्या गोष्टी खाल्ल्यास पोटाला आणि शरीराला त्याचा त्रास होतो. पाहूयात जांभूळ खाल्ल्यावर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याविषयी.

(Image : Google)

१. पाणी 

जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच अजिबात पाणी पिऊ नये. जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास आपल्याला डायरिया, पोटाच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यावर ३० ते ४० मिनीटे जाऊ द्यावीत आणि त्यानंतरच पाणी प्यावे. 

२. हळद

आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यामुसार हळद आणि जांभूळ एकमेकांसोबत पोटात गेले तर पोटाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यावर लगेच हळद असलेला पदार्थ खाऊ नका. साधारण अर्धा ते एक तासाने हा हळदीचा पदार्थ खाल्ला तरी चालू शकतो. 

३. दूध 

दूध आणि जांभूळ हेही विरुद्ध कॉम्बिनेशन समजले जाते. जांभळावर दूध प्यायल्यास गॅसेस, अपचन आणि पोटदुखीच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे दूध किंवा दुधाचे पदार्थ आणि जांभूळ खाताना यांमध्ये किमान काही काळ अंतर ठेवावे.

(Image : Google)

४. लोणचं 

आपण अनेकदा जेवल्यानंतर फळं खातो. किंवा जाता येता फळं तोंडात टाकतो आणि जेवायला बसतो. जेवणाची चव वाढवणारे लोणचे हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक असतो. लोणच्यामध्ये असणारे घटक आणि जांभूळ यांची एकमेकांशी रिअॅक्शन होऊ शकते. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे टाळायला हवे.

टॅग्स :अन्नफळे