Lokmat Sakhi >Food > जॅकी श्रॉफला आवडते वाफेवर शिजवलेली वांग्याबटाट्याची भाजी, पाहा चमचमीत रेसिपी

जॅकी श्रॉफला आवडते वाफेवर शिजवलेली वांग्याबटाट्याची भाजी, पाहा चमचमीत रेसिपी

Jackie Shroff's Favourite Vangi Batata Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, वांग्याबटाट्याची महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2024 04:49 PM2024-02-05T16:49:48+5:302024-02-05T16:53:21+5:30

Jackie Shroff's Favourite Vangi Batata Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, वांग्याबटाट्याची महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी करून पाहा..

Jackie Shroff's Favourite Vangi Batata Recipe | जॅकी श्रॉफला आवडते वाफेवर शिजवलेली वांग्याबटाट्याची भाजी, पाहा चमचमीत रेसिपी

जॅकी श्रॉफला आवडते वाफेवर शिजवलेली वांग्याबटाट्याची भाजी, पाहा चमचमीत रेसिपी

बॉलीवूडचा 'भिडू' अर्थात जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आपल्या अभिनय आणि हटके बोलण्याच्या शैलीसाठी ओळखला जातो. बॉलीवूडपासून जॅकी दूर जरी असले तरी, सध्या ते सोशल मिडीयावर फार चर्चेत राहतात. त्यांच्या अनेक व्हिडिओला लोकांकडून पसंती मिळताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कांदा-भेंडी ही रेसिपी सोशल मीडियात व्हायरल झाली होती. सध्या त्यांची वांगी बटाट्याची रेसिपी व्हायरल होत आहे (Brinjal-Potato).

एका मुलाखतीत त्यांनी वांग्याबटाट्याची भाजी आवडत असल्याचं सांगितलं. पण महाराष्ट्रीयान पद्धतीने वांग्याबटाट्याची भाजी तयार करायची कशी? हे अनेक जणांना ठाऊक नसेल (Cooking Tips). जर घरात भाजी उपलब्ध नसेल तर, आपण एक बटाटा २ वांगी घेऊन चटपटीत भाजी तयार करू शकता(Jackie Shroff's Favourite Vangi Batata Recipe).

वांग्याबटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य

वांगी

बटाटे

तेल

जिरं

कपभर उरलेल्या भाताचे करा इन्स्टंट कुरकुरीत पेपर डोसे, डब्यासाठी बेस्ट ऑप्शन-खाल पोटभर

मोहरी

हिंग

हिरव्या मिरचीचा ठेचा

कडीपत्ता

कांदा

लाल तिखट

हळद

धणे पूड

जिरे पूड

मीठ

टोमॅटो

किसलेलं ओलं खोबरं

कृती

सर्वप्रथम, २ वांगी आणि एक बटाटा चिरून धुवून घ्या. एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, मोहरी, चिमुटभर हिंग, हिरव्या मिरचीचा ठेचा, कडीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून भाजून घ्या. कांद्याचा रंग लालसर झाल्यानंतर त्यात चिरलेली वांगी - बटाटे घालून २ मिनिटांसाठी भाजून घ्या. वांगी-बटाटे भाजून घेतल्यानंतर त्यात एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद, एक चमचा धणे पूड, जिरे पूड, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करा.

ना गॅस-ना पाणी, ५ मिनिटात बटाटे शिजवण्याची हटके ट्रिक, बटाटे शिजतील परफेक्ट

सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर कढईवर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा, व वाफेवर भाजी शिजवून घ्या. हवं असल्यास आपण त्यात किसलेलं ओलं खोबरं देखील घालून मिक्स करू शकता. अशा प्रकारे चमचमीत वांग्याबटाट्याची भाजी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Jackie Shroff's Favourite Vangi Batata Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.