Join us  

तळलेल्या जाड पोह्यांचा करा कुरकुरीत खमंग चिवडा, चटकदार चिवडा-टिकेल महिनाभर फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2023 3:44 PM

Jada Poha Chivda recipe | Thick Poha Namkeen : डब्यात भरून ठेवलेला चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहावा यासाठी काही खास टिप्स

महाराष्ट्रात दिवाळी म्हटलं रोषणाईचा सण. या सणानिमित्त साफसफाई, फराळ, शॉपिंग या सगळ्या गोष्टी करण्यात येते. प्रत्येकाची फराळ करण्याची पद्धत वेगळी आहे. फराळामध्ये चिवडा हा पदार्थ आवर्जुन केला जातो. काहींकडे पोह्याचा, मक्याचा, शेवचा चिवडा केला जातो. पोह्यांच्या चिवड्यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत.

पातळ, जाडसर, दडपे किंवा कांदे पोह्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कुरकुरीत जाड पोह्यांचा वापर करून चिवडा तयार करण्यात येतो. पोह्यांचा चिवडा हा खरंतर तयार करायला सोपा, पण योग्य साहित्यांचा वापर न केल्यास त्याचे गणित बिघडते. जाड पोह्यांचा चिवडा कसा तयार करायचा? जाड पोह्यांचा चिवडा लवकर मऊ पडू नये म्हणून काय करावे? पाहा(Jada Poha Chivda recipe | Thick Poha Namkeen).

जाड पोह्यांचा चिवडा करण्यासाठी लागणारं साहित्य

पोहे

शेंगदाणे

खोबऱ्याचे काप

चणा डाळ

पाक चुकतो-रव्याचा लाडू फसतो? चिंता सोडा, परफेक्ट रव्याचे लाडू करा झटपट, टिकतीलही महिनाभर

हिरवी मिरची

कडीपत्ता

मनुके

मीठ

हळद

लाल तिखट

पिठी साखर

कृती

सर्वप्रथम, कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर चाळणी ठेवा, व त्यात पोहे घालून गरम तेलात तळून घ्या. पोहे तळताना काळजीपूर्वक तळा. कारण जाड पोहे लवकर करपतात. जाड पोहे तळून झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून ठेवा. नंतर चाळणीत कपभर शेंगदाणे घालून तळून घ्या. तळलेले शेंगदाणे पोह्यांवर घालून ठेवा. त्याचप्रमाणे खोबऱ्याचे काप, भाजलेले चणा डाळ, काजू, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कडीपत्ता, मनुके तळून घ्या. व तळलेले सर्व साहित्य पोह्यांवर घालून मिक्स करा.

तळकट म्हणून शंकरपाळे खाणं टाळताय? तेलाचा एक थेंबही न वापरता-कढईत तयार करा खुसखुशीत शंकरपाळे

साहित्य मिक्स केल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, २ ते ३ चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, एक चमचा पिठीसाखर घालून साहित्य एकत्र करा. आपण त्यात बारीक शेव देखील घालू शकता. अशा प्रकारे जाड पोह्यांचा खमंग क्रिस्पी चिवडा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :दिवाळी 2023कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न