सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही फिटनेस सोबतच खाण्याची देखील तितकीच शौकीन आहे. जान्हवीला आपल्या नेहमीच्या खाण्यापिण्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला खूपच आवडतात. जान्हवी (Janhvi Kapoor's Favorite Thecha Recipe) आपल्या डाएट आणि फिटनेसची जितकी लक्षपूर्वक काळजी घेते तितकेच रोज (Green Chilli Thecha Recipe) खाण्यात वेगवेगळ्या चवीचे पदार्थ असावेत असा तिचा नेहमीच प्रयत्नत असतो. हिवाळ्यात (Maharashtrian Hirvi Mirchi Thecha) शक्यतो शरीराला उष्णता मिळवून देणारे चटपटीत, चमचमीत पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. जान्हवीला सध्या अशाच एका महाराष्ट्रीयन गावरान पदार्थाची भुरळ पडली आहे. पिठलं भाकरी किंवा अगदी साध्या वरण भातासोबत आवर्जून दिला जाणारा पदार्थ म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा(How To Make Thecha At Home).
हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीत हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा असेल तर नेहमीच्याच जेवणाला देखील अगदी सुंदर चव येते. आपण हा ठेचा घरी कित्येकदा ट्राय करतो पण तो आपल्याला हवा तसा होतोच असे नाही. कारण ठेचा करायला सोपा वाटत असला तरी तो परफेक्ट होण्यासाठी त्यातील सगळे जिन्नस योग्य प्रमाणात घ्यावे लागतात. कडाक्याच्या थंडीत गरमागरम भाकरी किंवा वरण भातासोबत हिरव्या मिरचीचा तिखट, झणझणीत ठेचा असेल तर मग चार घास जास्तच जातात. जान्हवी कपूर सोबतच संपूर्ण महाराष्ट्राला आवडणाऱ्या या हिरव्या मिरचीच्या ठेचा अगदी परफेक्ट तयार करण्यासाठीची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. जिरे - १ टेबसलस्पून २. शेंगदाणे - १/२ कप ३. हिरव्या मिरच्या - ८ ते १० हिरव्या मिरच्या४. कडीपत्त्याची पाने - १० ते १२ पाने ५. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ६. लसूण पाकळ्या - ७ ते ८ लसूण पाकळ्या७. कोथिंबीर - १/२ कप कोथिंबीर८. लिंबाचा रस - १ टेबलस्पून ९. मीठ - चवीनुसार१०. तेल - २ ते ३ टेबलस्पून
कपभर आवळ्याचे करा घरगुती आवळा सीरप, इन्स्टंट आवळा सरबताची साधीसोपी रेसिपी...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये थोडेस तेल घेऊन त्यात जिरे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कडीपत्त्याची पाने, पांढरे तीळ, लसूण पाकळ्या, कोथिंबीर घालावी. २. आता तेलात हे सर्व जिन्नस हलकेच परतून घ्यावे. ३. ४ ते ५ मिनिटे हे सगळे जिन्नस तेलात खरपूस परतून झाल्यावर ते आपल्या सोयीनुसार मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्त्यात काढून घ्यावेत. ४. त्यानंतर हे सगळे मिश्रब खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून त्याची भरड तयार करून घ्यावी.
‘नो ब्रेड मटार टोस्ट सँडविच‘- हिवाळ्यात नाश्त्याला करा मटारचा हा पदार्थ, मुलं म्हणतील रोज कर...
तयार आहे झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा. हा ठेचा तुम्ही तोंडी लावणीसाठी ताटात वाढू शकतात. थंडीच्या दिवसांत भाकरी किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला जास्त तिखट ठेचा नको असेल तर तुम्ही तिखटपणा कमी करण्यासाठी बेसन पीठ भाजून यात घालू शकता. यामुळे ठेच्याला चांगली चव येईल.