हिवाळ्यात शक्यतो शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ अवश्य खाल्ले जातात. थंडीच्या दिवसांत रताळं, नाचणी, तीळ, साजूक तूप, आवळा, गाजर असे पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला त्याचा फायदा तर होतोच शिवाय (Janhvi Kapoor's Sweet potato paratha recipe) थंडीपासून देखील बचाव केला जातो. असे गरम पदार्थ खाऊन आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून आपले रक्षण केले जाते. थंडीच्या मोसमांत बाजारांत रताळं ( Janhvi kapoor’s favourite Ragi sweet potato paratha) फार मोठ्या प्रमाणावर विकायला असतात. प्रामुख्याने हिवाळ्यात येणारे हे कंदमुळं आपण उकडवून किंवा त्यापासून वेगवेगळे पदार्थ करून खातो. रताळ्याचा किस, रताळ्याचा हलवा, शिरा, रताळ्याचे वेफर्स, कटलेट्स असे अनेक पदार्थ घरोघरी हिवाळ्यात तयार केले जातात( Janhvi kapoor’s favourite Ragi sweet potato paratha).
'रताळं' हे फक्त उपवासालाच प्रामुख्याने खाल्लं जात अशी समजूत आपल्याकडे आहे. परंतु इतर वेळी देखील आपण या रताळ्याचे अनेक पौष्टिक पदार्थ तयार करून खाऊ शकतो. रताळ्याच्या अनेक पदार्थांपैकी रताळ्याचा हेल्दी पराठा सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हीचा हिवाळ्यातील खास आवडता पदार्थ आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आपल्या फिटनेसाठी ओळखली जाते जान्हवी व्यायाम आणि डाएट काटेकोरपणे फॉलो करते. तिच्या डाएटमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. जान्हवी हा रताळ्याचा पौष्टिक पराठा आपल्या ब्रेकफास्ट किंवा जेवणात अगदी आवडीने खाते. जान्हवी कपूरला आवडणारा हा हेल्दी आणि पौष्टिक रताळ्याचा पराठा घरी करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पाणी - २ कप
२. मीठ - चवीनुसार
३. नाचणीचे पीठ - २ कप
४. पांढरे तीळ - २ ते ३ टेबलस्पून
५. रताळं - १ ते २ (रताळं उकडवून मॅश केलेल)
६. आलं - १/२ टेबलस्पून (किसलेलं आलं)
७. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
८. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
९. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून
१०. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)
हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या विकत आणल्या, पण लवकर सडतात? ५ उपाय - भाज्या खा मनसोक्त...
बाजरीची भाकरी नी उडदाचं घुटं, अस्सल मराठी झणझणीत बेत! खा घुटं, बाकी सगळं त्यासमोर फिकं...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका भांडयात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून गरम करुन घ्यावे. या गरम पाण्यात चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, साजूक तूप घालून मीठ पाण्यांत विरघळवून घ्यावे.
२. आता या गरम पाण्यांत नाचणीचे पीठ घालून ते चमच्याने हळूहळू एकजीव करुन नाचणीचे पीठ पाण्यांत कालवून घ्यावे. त्यानंतर ५ ते १० मिनिटांसाठी यावर झाकण ठेवून द्यावे.
३. ५ ते १० मिनिटानंतर हे नाचणीचे पीठ एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. आता नेहमीच्या कणकेप्रमाणे नाचणीचे पीठ मळून घ्यावे. नाचणीचे पीठ मळून झाल्यानंतर ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवून द्यावे.
४. एक बाऊलमध्ये उकडलेलं रताळं घेऊन त्याची सालं काढून ते मॅश करून घ्यावे. मॅश करून घेतलेल्या रताळ्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं आलं, जिरेपूड बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून सगळे जिन्नस एकजीव करून पराठ्याचे स्टफिंग तयार करून घ्यावे.
५. आता नाचणीच्या मळून घेतलेल्या पिठाचे गोळे तयार करून ते बरोबर मधोमध दाब देत खोलगट करून त्यात रताळ्याचे स्टँफिंग भरून घ्यावे. स्टफिंग भरून झाल्यानंतर या पिठाचा परत गोल गोळा तयार करून घ्यावा.
६. आता हा स्टफिंग भरुन घेतलेला गोळा चपातीप्रमाणे नेहमीसारखा लाटून घ्यावा. गरम तव्यावर थोडेसे साजूक तूप सोडून दोन्ही बाजुंनी हा पराठा खरपूस भाजून घ्यावा.
रताळ्याचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम लोणचं, दही, हिरवी चटणी किंवा सॉस सोबत हा गरमागरम पराठा खाण्यासाठी सर्व्ह करावा.