गोकुळाष्टमीच्या दिवशी पंचामृताच्या प्रसादाचे फार महत्व असते. कृष्णाला दही, दूध प्रिय असल्याचे अनेक कथांमध्ये, फोटोंमध्ये आपण पाहिले आहे. पंचामृतानं देवांच्या मुर्तीचा अभिषेक केला जातो तर कधी प्रसाद म्हणूनही दिले जाते.(krishna Janmashtami Panchamrit) दिवसातून एकदा पंचामृत प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. पंचामृत बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात आणि ते योग्य पद्धतीनं कसं बनवायचं हे पाहूया. (How to Make Panchamrit)
पंचामृतासाठी लागणारं साहित्य (What are the five elements of Panchamrit)
दूध - 1 ग्लास
दही - 1 ग्लास
तूप - १ टीस्पून
मध - 3 टीस्पून
साखर - चवीनुसार
तुळशीची पाने चिरलेली - 10
चिरलेले ड्रायफ्रुट्स - 20
कृती
पंचामृत बनवण्यासाठी तुम्हाला दही, दूध, एक चमचा मध, तूप आणि साखर आवश्यक आहे.
दही, दूध, तूप आणि साखर एका भांड्यात घ्या आणि चांगले एकत्र करून घ्या. तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्येही फिरवू शकता.
आता त्यात 8 ते 10 तुळशीची पाने देखील घालता येतील, चिरलेला मखना आणि ड्रायफ्रुट्स देखील घालता येतील. तयार आहे पंचामृत