Join us  

जन्माष्टमी विशेष : विरजणाशिवाय 'या' ४ पद्धतीने करा घट्ट, मलईदार दही; १५ मिनिटांत बनेल विकतसारखं दही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 10:36 AM

Janmashtami Special 4 Ways to Set Curd Without Starter : जन्माष्टमीला (Janmashtami) दह्याच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. अशावेळी बाहेरून आणण्यापेक्षा घरच्याघरी तुम्ही विरजणाशिवाय दही लावू शकता.

दही (Curd) हा असा दुग्धजन्य पदार्थ आहे. ज्याचे प्रत्येक घरांत सेवन केले जाते. सकाळच्या नाश्त्याला तर कोणी दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करतो. (Gokul Ashtami 2023)  काही लोक असे असतात जे रात्रीच्या जेवणात दह्याचा समावेश करतात. दही फक्त चपाती आणि भाताबरोबरच खाल्ले जात नाही तर कढी, दही वडा अशा पदार्थांमध्येही वापरलं जातं. जन्माष्टमीला (Janmashtami) दह्याच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. अशावेळी बाहेरून आणण्यापेक्षा घरच्याघरी तुम्ही विरजणाशिवाय दही लावू शकता. (H0w to make curd at home)

दह्यात प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणात असतात. नेहमी मार्केटमधून दही आणण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी एकदम सोप्या पद्धतीनं दही बनवू शकता. विकतसारखं घरच्याघरी अगदी कमी वेळात बनवण्याच्या सोप्या स्टेप्स पाहूया. 

घरी दही लावण्यासाठी विरजण नसतं तेव्हा ऐनवेळी दही कसं लावणार असा प्रश्न पडतो. कारण विजरणाशिवाय दही लावणं सोपं आहे. अशावेळी दही विकत आणण्याशिवाय पर्याय नसतो. काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही विरजणाशिवाय दही लावू शकता. 

मिरचीने दही लावा

सगळ्यात आधी दूध हलकं गरम करून घ्या त्यानतंर हे कोमट दूध एका भांड्यात घाला. त्यानंतर या दूधात दोन हिरव्या मिरच्या घाला. मिरचीचं देठ तसंच असेल याची खात्री करा. मिरची दूधात पूर्णपणे बुडायला हवं. दूधात मिरची बुडवल्यानंतर दूध एखाद्या गरम ठिकाणी ६ तासांसाठी ठेवून द्या. या उपायाने तुम्ही घरच्याघरी विरजणाशिवाय दही लावू शकता. 

गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी १५ मिनिटांत करा खव्याचे लाडू; तोंडात टाकताच विरघळतील मधूर लाडू

लिंबाने दही लावा

लिंबू घालून दही लावण्यासाठी तुम्हाला दूध लागेल. उकळत्या दूधात २ चमचे लिंबू घालून त्याचा रस पिळून घ्या. त्यानंतर ६ ते ७ तासांसाठी  दूध एखाद्या गरम ठिकाणी ठेवा. हा उपाय केल्याने दही लगेच लागेल.

चांदीचा शिक्का किंवा अंगठी

उकळत्या दूधात चांदीचा शिक्का किंवा चांदीची अंगठी घाला. त्यांतर दूध एखाद्या गरम ठिकाणी ८ तासांसाठी झाकून ठेवा. हा दही लावण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. 

साबुदाणा वडे करताना पीठात १ पदार्थ घाला, वडे फुटणार नाहीत -तेलही पिणार नाहीत

लाल मिरचीने लावा दही

फक्त हिरवी मिरचीच नाही तर लाल मिरचीसुद्धा दही लावण्यासाठी उत्तम ठरते. घरात जर हिरवी मिरची नसेल आणि लाल मिरची असेल तर तुम्ही आरामात विरजणाशिवाय दही लावू शकता. लाल मिरचीने दही लावण्यासाठी सगळ्यात आधी सुकलेली लाल मिरची तुम्हाला लागेल. लाल मिरची ७ ते ८ तासांसाठी उकळ्यात दुधात बुडवून ठेवा नंतर एका स्वच्छ आणि गरम जागेवर ठेवा. असं केल्याने दही व्यवस्थित, घट्ट लागेल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सजन्माष्टमी