Join us  

Janmashtami Special Food : घरी दही लावल्यास खूप पातळ होतं? गोकुळाष्टमीसाठी दही लावताना ५ टिप्स वापरा; घट्ट दही बनेल घरीच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 9:39 AM

Janmashtami Special Food : दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच जेवणाची चव वाढवते. यामुळेच बहुतेक लोकांना जेवणात दही घेणे आवडते.  

गोकुळाष्टमीच्या (Janmashtami 2022) नैवेद्यासाठी दही, दूध लागतंच. बाहेरून दही आणण्यापेक्षा तुम्ही घरीच दही लावून छान नैवेद्य दाखवू शकता. पावसाळ्यात दही घट्ट लागत नाही. दह्यात खूप पाणी पाणी होतं अशी अनेकांची तक्रार असते.  त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार. फक्त दही लावण्याच्या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवाव्या लागतील. (How to make curd or dahi at home)

दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच जेवणाची चव वाढवते. यामुळेच बहुतेक लोकांना जेवणात दही घेणे आवडते.  बाजारासारख्या दह्याच्या चवीचा आस्वाद तुम्ही घरबसल्या घेऊ शकता. (How to make perfect curd or dahi at home) जाणून घ्या दही लावण्याच्या सोप्या स्टेप्स.

घरी दही बनवताना दही गोठते पण वरचा थर गुळगुळीत होत नाह. दही सेट करताना तुमच्यासोबतही असेच काही होत असेल तर याचा अर्थ असा की दही सेट करताना तुम्ही एक छोटीशी चूक करत आहात. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ती चूक आणि जाणून घेऊया घरच्या घरी परफेक्ट दही बनवण्याची सोपी पद्धत.

१) विकतच्या दह्याप्रमाणे दही लावण्यासाठी प्रथम एका भांड्यात फुल क्रीम दूध घ्या. आता त्यात अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मिल्क पावडर घालून चांगले मिक्स करा.

२) दुधात कोणतीही गुठळी, बबल्स नसावे. आता हे दूध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. एक उकळी आली की गॅस बंद करा. तुम्हाला दिसेल की हे दूध नेहमीच्या दुधापेक्षा थोडे घट्ट होईल.

३) आता दूध थंड होण्यासाठी रुम टेंमरेचरवर ठेवा आणि दूध कोमट झाल्यावर एका भांड्यात दही काढा आणि त्यात थोडे पाणी मिसळा. ते दुधात घालून नीट ढवळून घ्या.

४) तयार दह्याचे मिश्रण एका भांड्यात ठेवा आणि 4 ते 5 तास उबदार ठिकाणी ठेवा. 4 ते 5 तासांनंतर दही फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा हे दही वापरा. या टिप्सनं दही बाजारासारखं घट्ट होईल आणि त्याची चवही अप्रतिम असेल.

५) जर तुम्हाला दही लवकर गोठवायचे असेल तर त्यासाठी मायक्रोवेव्ह वापरा. अर्धा लिटर दूध उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या. आता दुसर्‍या भांड्यात दोन चमचे दही घालून त्यात दूध घाला आणि पुन्हा झाकून ठेवा. मायक्रोवेव्ह 180 अंशांवर दोन मिनिटे प्रीहीट करा आणि मग स्विच बंद करा. आता त्यात दुधाचे भांडे ठेवा. दही तीन-चार तासांत गोठेल.

इतर टिप्स

- घट्ट दही बनवण्यासाठी फुल क्रीम दूध घ्या.

- गरम दुधात दही मिसळून दही सेट करू नका, नाहीतर त्यात पाणी जास्त होईल. 

- ज्या दह्यातून तुम्ही दही लावत आहात ते जास्त आंबट नसावे.

- ज्या भांड्यात दूध उकळले जाते त्या भांड्यात दही लावू नका.

- पावळ्यात दही बनवण्यासाठी दूधात थोडे जास्त दही घाला.

-  दही सेट करताना दूध जास्त गरम किंवा थंड नसेल याची खात्री करा.

- दही गोठले की रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा, नाहीतर आंबट होईल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.जन्माष्टमी