Join us  

फक्त १० मिनिटांत करा चविष्ट गोपाळकाला! पौष्टिक गोपाळकाला करण्याची सोपी झटपट रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2023 9:12 AM

Gopalkala Recipe In Just 10 Minutes: गोपाळकाला करण्याआधी ही एक सोपी रेसिपी एकदा बघून घ्या... झटपट गोपाळकाला तयार

ठळक मुद्देचवदार गोपाळकाला करायचा असेल तर ही रेसिपी एकदा बघा

कृष्णजन्म झाला की दुसऱ्यादिवशी गोपाळकाला असतो. दहिहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला जातो आणि मग गोपाळकाल्याचा प्रसाद वाटला जातो. एरवी खूप वेगवेगळ्या पदार्थांची सरमिसळ केली की त्याला 'गोपाळकाला' केला असं म्हटलं जातं. कारण गोपाळकाला असतोही तसाच..फक्त तो करताना प्रत्येक पदार्थाचं प्रमाण मात्र व्यवस्थित पडलं पाहिजे. मग बघा हा हा म्हणता टोपली भर गोपाळकाला फस्त होऊन जातो. असाच चवदार गोपाळकाला करायचा असेल तर ही रेसिपी एकदा बघा (Quick and easy recipe of making gopalkala). ही रेसिपी मधुराज रेसिपी या युट्यूब चॅनलवर शेअर केली आहे. (How to make Gopalkala?)

 

गोपाळकाला करण्याची कृतीसाहित्य१ वाटी पोहे

अर्धी वाटी मुरमुरे

अर्धी वाटी ज्वारीच्या लाह्या

डाळिंब, पेरू, केळी, पपई अशी तुमच्या आवडीची फळे वाटीभर

 

काजोलच्या आयुष्यातील ३ अत्यंत महत्वाच्या व्यक्ती, ती म्हणते, त्यांच्याशिवाय माझे काय झाले असते..

अर्धी वाटी दही

१ टेबलस्पून भिजवलेली हरबरा डाळ

१ टेबलस्पून तूप

चिमूटभर हिंग

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

चवीनुसार मीठ आणि तिखट

 

कृती १. सगळ्यात आधी पोहे २ ते ३ वेळा व्यवस्थित धुवून घ्या.

२. मुरमुरे आणि लाह्या कढईत ५ मिनिटे भाजून घ्या.

जास्त मेकअप केला तर आई खूप रागावते! पलक तिवारी सांगतेय, आईच्या शिस्तीचा धाक...

३. दह्यामध्ये मीठ आणि साखर घालून ते व्यवस्थित फेटून घ्या. आता या फेटलेल्या दह्यामध्ये भिजवलेले पोहे, मुरमुरे, लाह्या तसेच बारीक चिरलेली फळे आणि काेथिंबीर घाला.

४. आता एका छोट्या कढईमध्ये तुपाची जिरे- हिंग- मिरच्या घालून फोडणी करा आणि ती आपल्या गोपाळकाल्यामध्ये टाका.

५. आता थोडंसं मीठ, गरज वाटल्यास लाल तिखट असं सगळं टाकलं आणि सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की गोपाळकाला झाला तयार. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.जन्माष्टमीपाककृती